आरोग्य आहार

आरोग्य आहार 

ओट्स कोकोनट चॉकलेट बर्फी 

साहित्य: १ वाटी डेसिकेटेड कोकोनट , १/२ वाटी ओट्स , दिड वाटी साखर , पाव वाटी चॉकलेट पावडर, १/२ वाटी मिल्क पावडर,. 

कृती : प्रथम ओट्स मिक्सर मध्ये बारीक करून घ्यावेत . १ वाटी डेसिकेटेड कोकोनट , बारीक केलेले ओट्स, एकत्रत करावेत. 

एका नॉनस्टिक पॅन मध्ये प्रथम दिड वाटी साखर घेऊन ती बुडेल इतकेच पाणी टाकावे. पाक तयार करून घ्यावा. कडक पाक तयार झाला कि त्यामधे एकत्रित केलेले डेसिकेटेड कोकोनट व ओट्स यांची पावडर टाकावी. नंतर चांगले मिक्स करून झाल्यावतर त्यामध्ये चॉकलेट पावडर व मिल्क पावडर टाकून  चांगले हलवावे . कढई मधून गोळा सुटू लागल्यानंतर एका ताटाला तूप लावून त्यावर तो गोळा पसरून घ्यावा व त्रिकोणी- चौकोनी आकाराच्या वड्या पाडाव्यात. 

नारळ आणि ओट्स मुळे वड्या पौष्टिक होतात. अगदी कमी प्रमाणात वापरलेल्या चॉकलेट मुळे रंग व चव येते. Post a Comment

0 Comments