जो बाईडन अमेरिकेचे ४६वे राष्ट्राध्यक्ष

 जो बाईडन अमेरिकेचे ४६वे राष्ट्राध्यक्ष 

अजूनही मत मोजणी सुरु , ट्रम्प हार मानायला तयार नाही 


कमला हॅरिस अमेरिकेच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष 

वेब टीम वॉशिंग्टन - अमेरिकन माध्यमांनी मतमोजणीच्या कल पाहून जो बाईडन यांना अमेरिकेचे ४६वे राष्ट्रपती म्हणून घोषित केले गेले.उशिरा हाती आलेल्या बातमी नुसार ७७ वर्षीय जो बाईडन यांना ७५,१९३,०२२ मते मिळाली असून ती एकूण मतदानाच्या ५०.६४ टक्के इतकी आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प यांना  ७०,८०४,९६८ म्हणजेच ४७.६९ टक्के मते मिळाली अमेरिकन प्रणाली नुसार २७० इलेक्टोरल मतांची निवडून येण्यासाठी आवश्यकता असतांना जो बाईडन यांना २९० इलेक्टोरल मते मिळाली असून मत मोजणी संपे पर्यंत ते ३०० इलेक्टोरल मतांचा पल्ला गाठतील असा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. 


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बाईडन यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर अमेरिकन जनतेने रस्त्यावर उतरून जल्लोष केला. यावेळी बोलतांना जो बाईडन म्हणाले कि "मी संपूर्ण अमेरिकेचा अध्यक्ष आहे, ज्या मतदारांनी ट्रम्प यांना मतदान केले त्यांच्या भावना मी समजू शकतो. आम्ही दोघ एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहोत शत्रू नाही. अमेरिके मध्य कोणतेही वंशभेदाचे, वर्णभेदाचे , जातीभेदाचे, धर्मभेदाचे राजकारण केले जाणार नाही. मी अमेरिका तोडणारा नाही तर जोडणारा राष्ट्राध्यक्ष असें असा विश्वास त्यांनी व्यक्त केला." 

अमेरिकेच्या काही राज्यात अजूनही मतमोजणी सुरु असून अरिझोना राज्यातील मतमोजणी बाबत ट्रम्प यांनी आक्षेप नोंदवत न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. सोमवार पासून त्यावर सुनावणी होणार आहे.

जो बाईडन यांच्या विजयात अमेरिकेच्या पहिल्या महिला औपाध्यक्ष म्हणून नियुक्त झालेल्या, कमला हॅरिस यांचा सिंहाचा वाटा आहे. जो बाईडन  यांनी भाषणात त्यांचेही कौतुक केले. त्या पहिल्या महिला उपाध्यक्ष असून अश्वेत वर्णीय , दक्षिण आशियातील पहिला महिला आहेत.असे गौरवोद्गार त्यांनी  काढले तर कमला हॅरिस यांनी येणारा काळ आणि मार्ग खडतर असला तरी आम्ही त्यासाठी तयार असून यातून चांगला मार्ग काढू तसेच अमेरिकेत वर्ण भेदातून दिली जाणारी विषमतेची वागणूक बदलून अमानतेची वागणूक देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत असेही त्या म्हणाल्या. Post a Comment

0 Comments