करोना बाधितांना नटराज
उपचार सेंटरचा मोठा आधार
: संघटनमंत्री रवींद्र अनासपुरे
वेब टीम नगर - करोनाच्या संकटकाळात सर्वसामान्य, गरजू करोना बाधित रुग्णांनासाठी चालवण्यात येत असलेल्या नटराज कोविड सेंटर माध्यमातून फार उत्कृष्ट व नि:स्वार्थी रुग्ण सेवा चालू असल्याचे पाहून समाधान वाटत आहे. करोना बाधितांना हे मोफत उपचार सेंटर मोठा आधारस्तंभ आहे. भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते कायम असेच चांगल्या लोकसेवेचे कार्य करत असतात, असे प्रतिपादन भाजपा उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री रवींद्र अनासपुरे यांनी केले.
शहर भारतीय जनता पार्टी, महानगरपालिका व पंडित दीनदयाळ पतसंस्थेच्या संयुक्त विद्यमाने नटराज कोविड सेंटर ला भाजपा उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री रवींद्र अनासपुरे यांनी भेट देऊन रुग्णांची विचारपूस करत तेथील डॉक्टरांकडून सविस्तर माहिती घेतली. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, शहर भाजपाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे,पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत लोढा, संजय ढोणे, निलेश चिपाडे पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी महापौर बाबसाहेब वाकळे यांनी यावेळी मनपाच्या माध्यमातून देण्यात येत असलेल्या वैद्यकीय सुविधांची सविस्तर माहिती दिली. करोनाच्या शेवटच्या रूग्णा पर्यत आम्ही हे उपचार केंद्र चालूच ठेवणार असल्याचे महेंद्र गंधे यांनी सांगितले. वसंत लोढा यांनी प्रास्ताविकात कोविड सेंटर मधून शेकडो रुग्णांनी करोनावर मात केली आहे. अनेकांचे मदतीचे हात आम्हाला मिळत आहे असे सांगितले.
0 Comments