वॉटर फिल्टर कॅम्पचा शुभारंभ

 वॉटर फिल्टर कॅम्पचा शुभारंभ

नगरसेविका संध्याताई पवार : दुषित पाण्यामुळे होणाऱ्या  रोगाला दूर ठेवण्यासाठी वॉटर फिल्टरचा पर्याय 

    वेब टीम नगर - पोटाच्या होणार्या रोगांमध्ये बरेच रोग हे दुषित पाण्यामुळे होतात, त्यामुळे आपण जे पाणी रोज पितो ते आरोग्याच्या दृष्टीने पिण्यालायक आहे की नाही हे पाहणे आता काळाची गरज ठरत आहे. अशा या रोगाला दूरच ठेवायचे असेल तर त्यासाठी वॉटर फिल्टर हा एक पर्याय आहे, असे प्रतिपादन नगरसेविका सौ.संध्याताई पवार यांनी केले.

     प्रभाग क्र.२ मधील नागरिकांसाठी अत्यंत सवलतीच्या दरात वॉटर फिल्टर ऑफर कॅम्पचा शुभारंभ श्रीराम चौकात नगरसेविका रुपालीताई वारे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व नागरिकांना फिल्टर देऊन करण्यात आला. यावेळी संध्याताई बोलत होत्या. याप्रसंगी नगरसेवक सुनिल त्र्यंबके, विनित पाउलबुधे, किरण जावळे, रासकर सर, योगेश पिंपळे, सचिन लोटके, प्रविण घुंगार्डे, दिनेश कुलकर्णी, अतुल आंधळे, एकनाथ नन्नवरे आदि उपस्थित होते.


     पवार पुढे म्हणाल्या, कोरोनाच्या विषाणुमुळे आज प्रत्येकजण स्वच्छतेला महत्व देत आहे. दुषित पाण्यामुळे आपल्याला ९० टक्के आजार पोटातून होतात. शुद्ध-स्वच्छ पाणी जरी आपण नियमित घेतले तरी बहुतेक रोगाला आळा बसू शकतो. दिवाळीमध्ये आपल्या प्रभागातील नागरिकांना कमी दरात वॉटर फिल्टर उपलब्ध करण्याचा आमचा चारही नगरसेवकांचा प्रयत्न आहे, असे सांगितले.

     नगरसेविका रुपालीताई वारे यांनी आपल्या भाषणात ग्राहकांना आरोग्याबरोबरच दिवाळी सणाचा आनंद घेता यावा, यासाठी आपली गरज आणि बजेट यांचा विचार करुनच हा कॅम्प ठेवला आहे. शिवाय वॉटर फिल्टरवर २५०० रुपयांचे मिक्सर फ्री ठेवण्यात आल्यामुळे गृहिणींना त्याचा फायदा होईल, असे सांगितले.

     बाळासाहेब पवार, निखिल वारे, सुनिल त्र्यंबके, विनित पाउलबुधे यांच्या पुढाकाराने प्रभागात सर्व ठिकाणी हा उपक्रम राबवित असल्याचे संयोजक किरण जावळे यांनी यावेळी सांगितले.

     कॅम्प सुरु होताच नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.


Post a Comment

0 Comments