आरोग्य आहार

आरोग्य आहार 

आलुपालक चीज पराठा 

साहित्य : ३ उकडलेले बटाटे,३ वाटी बारीक चिरलेला पालक , आले लसूण हिरवी मिरची पेस्ट,जिरे , मीठ , चाट मसाला , हळद, तिखट , गरम मसाला , चीज , ३ वाटी कणिक , पाव वाटी डाळीचे पीठ , ओवा , तेल. 

कृती : प्रथम एका पॅनमध्ये तेल घ्यावे , ते गरम झाल्यावर त्यामध्ये आले लसूण हिरवी मिरची पेस्ट टाकून , हळद टाकावी. मग तीन वाटी बारीक चिरलेला पालक टाकून दोन वाफ काढून घ्यावात. आता त्यामध्ये उकडलेला मॅश केलेले बटाटे, मीठ चवीपुरती साखर , चाट मसाला , गरम मसाला , टाकून चांगले हलवून एक वाफ आणावी. गॅस बंद करावा व तयार भाजी मध्ये भरपूर चीज किसून घालावे व भाजी गर करण्यास ठेवावी.

३ वाटी कणिक,पाव वाटी डाळीचे पीठ,ओवा १ चमचा तेल व चवीपुरते मीठ टाकून कणिक मळून घ्यावे. दहा - पंधरा मिनिटांनी कणकेची पारी घेऊन त्यामध्ये तयार केलेल्या भाजीचा गोळा स्टफ करून पराठा अलगद लाटून घ्यावा. दोन्ही बाजूने बटर टाकून गुलाबीसर भाजून घ्यावा. Post a Comment

0 Comments