दिवाळी शॉपिंग महोत्सव

 दिवाळी शॉपिंग महोत्सव 

फटका बाजारात काहीसा संभ्रम 

यंदाची दिवाळीही  फटाके रहित दिवाळी असावी असा प्रस्ताव आरोग्य मंत्रालयाच्यावतीने सरकारला देण्यात आला असला तरी मंत्रिमंडळ बैठकीत या वर चर्चा झाली. मात्र कोणताही ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे फारतर सार्वजनिक ठिकाणी फटाके उडवण्यास बंदी घातली जाईल असा अनेकांचा अंदाज आहे.पण या प्रस्तावाचा फटाकेविक्रीवर काही परिणाम होतो कि नाही हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

अहमदनगर फटका असोसिएशन च्या वतीने नगर-कल्याण रस्त्यावर जाधव पेट्रोल पम्पाच्या अलीकडे फटाक्यांची दुकाने उभारण्यात आली आहेत. यंदा कोरोनाच्या प्रादुर्भाव मुळे येथील फटाक्यांच्या दुकानांची संख्या रोडवल्याचे दिसते. गेल्यावर्षी याठिकाणी ५४ दुकाने थाटण्यात आली होती तर यावर्षी ३० दुकाने थाटण्यात आली आहेत. यंदा फटाक्याच्या दरातही काही फारसा फरक पडलेला नाही. किंबहुना काही फटाक्यांच्या किमती कमी झाल्या आहेत . या वर्षी फटका स्टॉल वाल्यांनीही कमी प्रमाणात फटाके मागविले असून ऐन वेळी मागणी वाढल्यास फटाक्याच्या किमती वाढू शकतील. असा  अंदाजही व्यक्त  होत आहे. 

  

फटाक्यांमुळे होणारे ध्वनी प्रदूषण आणि वायुप्रदूषणाचा धोका लक्षात घेऊन कमी आवाजाचे फटाके मागविण्यात आले आहेत. त्यात आकाशात  उंच गेल्यावर फुटणाऱ्या फटक्यात १० शॉट , ४० शॉट , ५० शॉट असे प्रकार उपलब्ध असून विना आवाजाच्या फटक्यात भुईचक्र, लेस, फुलबाज्या, भुईनळा असे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. 

आवाजाच्या फटाक्यांमध्ये सुतळी बॉम्ब ,  ताज,अश्या अनेक नावांचे फटाके सध्या उपलब्ध आहेत. आवाज करणारे फटाके २५ रु ते १२५रु पर्यंत तर बिना आवाजाचे १०रु ते १५०रु पर्यंत उपलब्ध आहेत. आवाजाचे आणि बिन आवाजाच्या फटाक्यांना सारखीच मागणी आहे. मात्र यंदा फटका  स्टॉलसची संख्या रोडावली आहे. त्यामुळे यंदा शेवटच्या काही दिवसात फटाक्यांचा तुटवडा जाणवण्याची शक्यता असल्याचे अहमदनगर फटका असोसिएशन चे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी सांगितले. 

Post a Comment

0 Comments