भ्रमंती
पाणी पुरवठा बारव
अहमदनगरच्या पाणीपुरवठ्यात कधी काळी योगदान देणारी सुमारे ४०० वर्षाच्या इतिहासाची साक्षीदार असलेली जामखेड रस्त्यावरची हत्ती बारव हि विहीर. निजामशाहीच्या काळात जामखेड रस्त्यावर दरेवाडी जवळ हि विहीर बांधण्यात आली .पावसाळ्यात आजूबाजूच्या परिसरातील डोंगरदऱ्यातून वाहत येणारी पाणी या विहिरीत साठून ते खापरी नळाद्वारे भुईकोट किल्ला , फराह बक्ष महाल , आणि शहरातील काही भागात पुरवले जात असे. पुढे कालौघात खापरी नळ योजना बंद झाली तसे या बारवे कडेही दुर्लक्ष झाले. वास्तविक पाहता आजही या बारवेत पाणी साठते मात्र या बारवेत लोकांनी कचरा टाकल्याने तिची दुरावस्था झाली.
खापरी नळ योजनेच्या अगोदर पासून हि विहीर अस्तित्वात असल्याच्या पाऊलखुणा तिथे सापडतात या विहिरीच्या एका बाजूला मोठी दगडी उतरंड असून पूर्वीच्या काळी या उतरंडी पासून विहिरीत सोडलेली मोट हत्ती बांधून ओढली जायची म्हणून तिला हत्ती बारव असे नाव पडले असावे . या विहिरीला चारही बाजूंनी पायऱ्या असून पसरट आणि विहिरीच्या आत या पायऱ्याचा आकार निमुळता अश्या ३-४ मजली स्वरूपात खोल अशी या विहिरींची बांधणी आहे.
अगदी अलीकडच्या काळात तिथे गणपती विसर्जन आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी कचरा टाकल्याने या बारवांची खोली या बारवाची खोली काहीशी कमी झग्लाई. मात्र शहरातील पर्यावरण प्रेमींनी वेळीच तिची स्वचता केल्याने ती काहीशा चांगल्या अवस्थेत आहे. शिवाय या विहिरीला चांगला झिरप असल्याने पावसाळ्यात भरपूर पाणी साठत असल्याने या पाण्याचा सिंचनासाठी उपयोग करता येईल. या साठी सध्या प्रयत्न सुरु आहेत. असे सर्व असले तरी एकदा या बारवाला भेट देऊन तिची भव्यता त्या काळातील पाणी योजना आणि त्यांचा वापर एकदा नजरेखालून घालायलाच हवा .
0 Comments