सरकारच्या विरोधातील प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न

सरकारच्या विरोधातील प्रत्येक 

आवाज दडपण्याचा प्रयत्न  

भैय्या गंधे : अर्णव गोस्वामी यांच्या अटकेच्या निषेधार्थ नगर भाजपच्यावतीने तीव्र निषेध

वेब टीम  नगर -    रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णव गोस्वामी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याप्रकरणी राज्यात भाजपच्यावतीने आघाडी सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. नगरमध्ये भाजपाच्यावतीने गांधी मैदान येथील कार्यालयासमोर निदर्शने करुन निषेध नोंदविण्यात आला. याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र (भैय्या) गंधे, सरचिटणीस विवेक नाईक, तुषार पोटे, उपाध्यक्ष महेश नामदे, अमोल निस्ताने, किरण जाधव, सुजित खरमाळे, आकाश सोनवणे, यश शर्मा, मयुर राज पुरोहित योगेश मुथा आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी भैय्या गंधे म्हणाले, सरकार विरोधात भुमिका मांडली म्हणून अर्वण गोस्वामींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, महाविकास आघाडी सरकारने सुडबुद्धीने करण्यात आलेल्या कारवाईचा जाहीर निषेध आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेला पत्रकारितेवर हा मोठा आघात आहे. लोकशाहीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यांच्या नावाने गळा काढणारे सर्व या लोकशाहीच्या हत्याविरुद्ध, गळचेपीबद्दल मौन बाळगून आहेत. प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार घटनेने दिला आहे. या अधिकारावर घाला घालण्याचे काम या घटनेतून दिसून येते. १९७७  नंतर आणीबाणी संपुष्टात आली पण आजच्या महाविकास आघाडीची मानसिकता आणिबाणी समर्थन करणारी अशीच आहे. शिवसेना आणि काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र आल्यावर त्याच मानसिकतेचे प्रदर्शन करत आहेत. सरकारच्या विरोधातील प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न लोकशाहीस घातक आहे. अशा प्रत्येक दडपशाही विरोधात संघर्ष करणे हाच भाजपाचा नारा असेल.

     यावेळी महेश नामदे म्हणाले, लोकशाहीत पत्रकारितेला महत्व आहे. लोकांच्या भावाना वृत्तपत्र, चॅनेलच्या माध्यमातून प्रकट करुन समाजातील दृष्टप्रवृत्तीवर प्रहार करण्याचे काम ते करतात, परंतु या महाविकास आघाडीच्या सरकारने या पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करुन त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे. या विरोध भाजप आवाज उठविल्याशिवाय राहणार नाही.यावेळी राकेश थडकिया, प्रसाद बोरा, सुनिल तावरे, आनिष अनेचा, उमेश साठे, गुणाली मुथा, आशिष देशमुख, अभिजित चिप्पा, राजू सातपुते, साहिल शेख आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments