भ्रमंती

भ्रमंती   

भातोडी परगावचे जागृत नरसिंह देवस्थान 

भातोडी या गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, गावची महत्त्वाची ओळख म्हणजे भगवान नृसिंह मंदिर आहे.भारतात बरीच नृसिंह मंदिरे आहेत. छोटी कथा  भगवान नृसिंहाबद्दल बरेच काही सांगते. राक्षस हिरण्यकश्यप, आपला भाऊ हिरण्यक्ष, भगवान विष्णूने ठार मारल्यामुळे आणि ब्रह्मांड जिंकण्याकरिता, देवाचा बदला घेण्यासाठी ब्रम्हदेवाची घोर तपस्या केली .


बराच  काळ तपस्या केल्यावर हिरण्यकश्यपुला  ब्रम्हाकडून वरदान मिळाले की त्याला ना देव ना दानव, ना मानव ना पशु, ना अस्त्राने ना शस्त्राने,ना आत ना बाहेर, ना दिवस ना रात्री कोणीही त्याचा वध करू शकणार नाही.असे वरदान मिळाल्यावर तो आपल्या राज्यात परत आला आणि पृथ्वीवर विजय मिळवू लागला.त्याला प्रल्हाद नावाचा एक मूलगा होता.हिरण्यकश्यपला आपल्या मुलाला असुर विद्या शिकण्याची आणि असुरांचा शक्तिशाली राजा बनवण्याची इच्छा होती .त्यासाठी त्यानी प्रल्हादला एका गुरूकडे पाठविले,पण प्रल्हादने भगवान विष्णूची भक्ती
सोडण्यास नकार दिला.

हिरण्यकश्यपाने आपल्या वरदानाच्या अभिमानाने आणि पृथ्वीवर विजय मिळविण्याच्या विचारात स्वत:ला देव घोषित करण्याचा विचार केला आणि सर्व विष्णू पूजा बंद केल्या.

प्रल्हाद यानी आपल्या वडिलांना सांगितले की भगवान विष्णू हा एकमेव देव आहे आणि त्याने आपल्या वडिलांना देव म्हणून स्वीकारण्यास नकार दिला.रागाने हिरण्यकश्यपाने प्रल्हादला ठार मारण्याची आज्ञा केली. सेवकांनी प्रल्हादला पर्वताच्या माथ्यावरुन फेकला , समुद्रात बुडवण्याचा प्रयत्न केला , विषारी सर्पांच्या गुहेत बंद केले , आगीत फेकले  परंतु त्यांच्या विष्णू भक्तीच्या पुण्याईने त्याचे काही अहित झाले नाही.

सर्व उपाय विफल ठरल्याने सेवकांनी त्याला हिरण्यकश्यप कडे नेले, त्याने प्रल्हादाला विचारले की भगवान विष्णू कुठे आहेत? भगवान विष्णू सर्वत्र उपस्थित असल्याचे प्रल्हादने उत्तर दिले. त्याने प्रल्हादला विचारले की, स्तंभात तुझा विष्णू उपस्थित आहे का? आपल्या शक्तीच्या गर्वात भगवान विष्णूशी युद्ध कारण्यासाठी हिरण्यकश्यपाने आपली गदा घेतली व तेथील स्तंभावर प्रहार केला तेव्हा भगवान विष्णूने नरसिंहाच्या रूपात  खांबातुन प्रकट झाले ,त्यांचे शीर सिंहाचे आणि शरीर मानवाचे होते .हिरण्यकश्यप एक बलाढ्य योद्धा होता. त्याचे व नरसिंहाचे तुंबळ युद्ध झाले. 

अखेर भगवान नरसिहांनी हिरण्यकश्यपूला मिळालेल्या ब्रम्हदेवाच्या वरदानाचा मान राखत हिरण्यकश्यपाला त्याच्या रवड्याच्या उंबरठ्यावर (ना आत ना बाहेर ),आपल्या नखांनी (ना अस्त्राने ना शस्त्रांनी), संध्याकाळच्या वेळी (ना दिवसा ना रात्री ), आपल्या मांडीवर घेऊन त्याचे पोट फाडून त्याचा वध केला. 


नगर - सोलापूर मार्गावर २१ कि.मी. लांब असलेले भातोडी पारगाव हे गाव छोटेखानी , एकदिवसीय पर्यटना साठी आणि देव दर्शनासाठी एक उत्तम स्थान आहे.ह्या मंदिराचे बांधकाम दगडीअसून नदीपात्रापर्यंत पोहोचणाऱ्या ओवऱ्या ह्या मंदिराला आहेत. मंदिराच्या मध्यभागी छोटासा गाभारा असून तेथे नरसिहांची तांदळा स्वरूपातील मूर्ती आहे. पूर्वी बांधकामाच्या वेळी शिळा स्वरूप तांदळावर पहारीने प्रहार झाल्यावर त्यातून रक्त वाहू लागल्याची आख्यायिका सांगितली जाते. त्यानंतर येथे मंदिराची बांधकाम झाल्याचे जुनी जाणती माणसे सांगतात.    


Post a Comment

0 Comments