आरोग्य आहार

आरोग्य आहार 

कॉर्न पुलाव 

साहित्य : १ वाटी बासमती तांदूळ , दिड वाटी स्वियत कॉर्न , काजू पाव वाटी , मिरे , लवंग , दालचिनी , तमाल पत्र , मीठ , साखर ,तूप. 

कृती: १ वाटी बासमती तांदूळ धुवून चाळणीत काढून ठेवावा.नंतर एक वाटी तांदळामध्ये २ वाटी पाणी , थोडे लिंबू पिळून फडफडीत शिजवून घेणे. 

कढईमध्ये गायीचे तूप घेऊन प्रथम त्यामध्ये , मिरे,लवंग, दालचिनी,तमालपत्र , घालून फोडणी करावी त्यामध्ये स्वीट कॉर्न घालून झाकण ठेऊन २-३ मिन वाफ येऊ द्यावी मग शिजवलेला भात , मीठ,चवीपुरती (अगदी थोडी) साखर घालून एक वाफ आणावी . स्वीट कॉर्नमुळे साखर अगदी थोडीशीच घालावी. 

एका बाऊल मध्ये कॉर्न पुलाव काढून घ्यावा त्यावर तळलेल्या काजूने गार्निशिंग करावे.  Post a Comment

0 Comments