भ्रमंती

 भ्रमंती 

कोरीव शिल्पांच्या मंदिराचे बहाद्दूरगड


अहमदनगरच्या श्रीगोंद्यापासून वीस कोसांवर भीमा नदीच्या काठावर बहादूरगड हा किल्ला उभा आहे.यात एके काळी अवघ्या विश्वात नावाजलेल्या राजकुटांच्या काळातली मंदिर आहेत. त्या काळात उत्तम शिल्प,नक्षीकाम,बांधणी व नादीकाठी असलेल्या या मंदिरांनी खूप साऱ्या राजवटी,सत्ता,संघर्ष पाहिलंय यात अनेकांनी या मंदिरांचा संवर्धना पेक्षा उद्धवस्त करण्यात खूप काम केलं खुप सारी शिल्प तोडली त्यांचा नाश केला.

८०० वर्ष चा काळ लोटले तरीही हे हे मंदिर तसेच तग धरून आहे यातला प्रत्येक दगड हा इथल्या इतिहासाची ओळख करून देतो. किल्ल्यामधे सुबक नक्षीकाम असलेली  मंदिर आहेत.पेडगावात शिरल्यावर बहादुरगड किल्ल्याचे विखुरलेले अवशेष दिसतात. किल्ला आयताकृती आहे. त्याला दोन दरवाजे आहेत. त्यापैकी पहिला दरवाजा गावात आहे. त्याची अवस्था चांगली आहे. दुसरा दरवाजा किल्ल्याच्या शेवटच्या टोकाला आहे. गावातील दरवाजाला भव्‍य कमान आहे. त्यातून आत शिरल्यावर मारुतीच्या पाच फूट उंच मूर्तीचे दर्शन होते. त्यासमोर भैरवनाथाचे मंदिर आहे. बहादुरगडाचे वैशिष्ट्य म्हणजे तेथे यादव काळात बांधलेल्या पाच मंदिरांचा समूह आहे. ती सर्व मंदिरे काळ्या पाषाणात कोरलेली आहेत. ती सर्व मंदिरे दुर्लक्षित अवस्थेत आहेत. भैरवनाथाचे मंदिर त्यांच समूहापैकी एक आहे.

त्‍या मंदिराच्या समोर अनेक शिल्पाकृती विखुरलेल्या अवस्थेत दिसतात. त्यामध्ये काही वीरगळी आहेत, काही सतीच्या शिळा आहेत. मंदिराच्या समोर दगडी दीपमाळ आहे. मंदिराच्या पुढे तटबंदीकडे जाणारा रस्ता आहे. त्या रस्‍त्‍यावरून पुढे जाताना वाटेत अनेक घरांचे, वाड्यांचे अवशेष पडलेले दिसतात. काही अवशेष झाडी झुडपांमध्ये दडलेले आहेत. वाटेने चालताना सुबक नक्षीकाम असलेली दोन मंदिर नजरेस पडतात. त्या मंदिरांपैकी लक्ष्मीनारायणाचे मंदिर साधारण ब-या अवस्थेत आहे. त्या मंदिरामधील अलंकृत स्तंभ तसेच बाहेरील मुर्ती पाहण्याजोग्या आहेत. मंदिरात शिवलिंग आहे. मंदिरांच्या समोर पडझड झालेले तिसरे मंदिर नजरेस पडते. त्याच्‍या मागील बाजूस किल्ल्याची तटबंदी आहे.

तरीही हे मंदिर आज ही संवर्धनाच्या प्रतीक्षेत आहेत

लेखक, छायाचित्रकार - राजेंद्र बुलबले 

Post a Comment

0 Comments