जिल्हाधिकारी कार्यालय येथे मंडप व्यवसायिकांची निदर्शने

जिल्हाधिकारी  कार्यालय येथे

मंडप व्यवसायिकांची निदर्शने

वेब टीम नगर - कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर गेल्या आठ महिन्यांपासून शासनाने सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. त्याचबरोबर लॉन्स, कार्यालयातील कार्यक्रमांवर उपस्थितीवर बंधने असल्याने त्यावर टेन्ट, मंडप, केटरिंग, मंगल कार्यालय, बॅक्वेट हॉल, डि.जे., साऊंड, लाईट, डेकोरेटर, इव्हेंट, फोटोग्राफर, बगीवाले, ऑर्केस्ट्रा कलावंत, आचारी, पुरोहित,ऑर्केस्ट्रा , प्रिंटींग प्रेस, आदि अवलंबून आहेत. पर्यायाने त्यांच्या कुटूंबीयांवर उपासमारीचे वेळ आली आहे. त्यामुळे ते मानसिक तणावाखाली असून, आत्महत्या करण्यास प्रेरित होत आहे.  शासनाच्यावतीने बर्‍याच गोष्टीं सुरु केल्या आहेत. कार्यालय, लॉन्स सुरु केले परंतु ५० लोकांची मर्यादा असल्याने त्यावर अवलंबून असणार्‍या व्यवसायिकांची मोठी अडचण होत आहे. ही मर्यादा ५०० पर्यंत वाढवावी किंवा कार्यालय, लॉन्स, हॉलच्या क्षमतेच्या ५० टक्क्यांपर्यंत करण्यात यावी. या मागणीसाठी राज्यस्तरीय धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.

     त्या पार्श्‍वभुमीवर उत्सव सोहळे संघर्ष समिती अहमदनगरच्यावतीने  जिल्हा मंडप, लाईट, फ्लॉवर्स डेकोरेटर्स व्यवसायिक असोसिएशनच्यावतीने नगरमध्ये जिल्हाधिकारी  कार्यालय येथे जिल्ह्यातील संबंधित व्यवसायिकांनी निदर्शने करुन जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.याप्रसंगी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत मेहेत्रे, उपाध्यक्ष पोपट राऊत, जाफर शेख, रघुनाथ चौरे, बबन म्हस्के, विकास पटवेकर, अमित शेटे, बाळासाहेब लगे, सौरभ तरटे, समीर शेख, पंडितराव खरपुडे, राजेंद्र उदागे, मदन आढाव, रमेश परतानी आदिंसह जिल्ह्यातील व्यासायिक उपस्थित होते.

    

 याप्रसंगी बोलतांना अध्यक्ष चंद्रकांत मेहेत्रे  म्हणाले,  कोरोनामुळे विविध सर्वाजनिक कार्यक्रमांवर शासनाने बंदी घातल्याने त्यावर अवलंबून असणार्‍या लाखो लोकांचा रोजगार ठप्प झालेला आहे. टप्प्याटप्याने शासनाने सर्व गोष्टी सुरु केल्या आहेत. परंतु मंगल कार्यास फक्त ५० लोकांच्या उपस्थितीची अट अजूनही कायम आहे. ती रद्द करुन ५०० लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रमांना परवानगी द्यावी. त्यातून या व्यवसायातील विविध घटकांचा रोजगार पुर्ववत सुरु होईल. आधीच कोरोनामुळे अनेकांची परिस्थिती नाजूक झाली आहे, आणि त्यात कामधंदा नसल्याने मोठ्या संकटांना हे व्यवसायिक तोंड देत आहेत.  त्याचबरोबर विविध टॅक्स मात्र सुरु आहेत. याबाबत सरकारला वेळोवेळी आंदोलन, निवेदने दिली आहेत. परंतु यावर अजुनही सरकारने निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे ही परिस्थिती कायम राहिल्यास या व्यवसायावर अवलंबून असणार्‍यांना आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही, तरी सरकारने लवकरात लवकर यावर निर्णय घ्यावा, असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले.

     याप्रसंगी शहराचे आमदार संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, शिवसेना शहराध्यक्ष दिलीप सातपुते, विक्रम राठोड, बाहासाहेब बोराटे, संभाजी कदम आदिंनी या ठिकाणी येऊन संघटनेस पाठिंबा दर्शविला व शासनस्तरावर सर्वतोपरि प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिले. यावेळी विविध व्यवसायिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

     याप्रसंगी महेश जोंधळे, अमोल जाधव, राजेंद्र बोरुडे, राजु उईके, ताराचंद माने, सुधीर घोलप, इसाक सय्यद, मारुती झगडे, सुनिल गंगुले, अनिल भैलुमे, कलिम आत्तर, जालिंदर बर्डे, सुभाष औटी, बाळासाहेब पालवे, बहादूर आत्तर आदिंसह व्यवसायिक उपस्थित होते. यावेळी सर्वांनी काळा टी-शर्ट व काळा मास्क घालून सरकारचा निषेध नोंदविला. या मुकमोर्चात बँड, घोडे, बग्गीसह सहभागी झाले होते


Post a Comment

0 Comments