घरकुल वंचितांच्या २३१ प्लॉटसाठी मंगळवार पासून बुकिंग सुरु

 घरकुल वंचितांच्या २३१ प्लॉटसाठी

 मंगळवार पासून बुकिंग सुरु

८० हजार रुपयात बेघरांना मिळणार १ गुंठा जमीन 

आत्मनिर्भर आवास भूमीगुंठा योजना

वेब टीम नगर - मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या पुढाकाराने आत्मनिर्भर आवास भूमीगुंठा योजना कार्यान्वीत करण्यात आली असून, इसळक निंबळक येथे घरकुल वंचितांसाठी २३१ प्लॉट उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या प्लॉट बुकिंगचे प्रारंभ हुतात्मा स्मारक येथे मंगळवार दि.२७ ऑक्टोबर रोजी कॉ. बाबा आरगडे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

 मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन पंतप्रधान आवास योजना कार्यान्वीत करण्यासाठी मागील सहा वर्षापासून प्रयत्नशील होते. संघटनेच्या वतीने शासनस्तरावर पाठपुरावा करुन वेळोवेळी आंदोलन देखील केले. मात्र घरकुल वंचितांच्या प्रश्‍नाकडे सरकार लक्ष देण्यास तयार नसल्याने स्वत: संघटनेने पुढाकार घेऊन शहरा जवळील पड जमीन उपलब्ध करुन त्यावर ले आऊट प्लॅन टाकून हाऊसिंग सोसायटीच्या माध्यमातून घरकुल वंचितांना घरे उपलब्ध करुन देण्याची योजना कार्यान्वीत केली आहे. निंबळक इसळक येथे र्व्हे नं. ५४ या खडकाळ पड जमीनीवर २३१ प्लॉट पाडण्यात आले आहे. सदर १ गुंठ्याचे प्लॉट हाऊसिंग सोसायटीच्या माध्यमातून घरकुल वंचितांना ८० हजार रु. पर्यंत मिळणार आहे. प्रथम बुकिंग करणार्‍या घरकुल वंचितांना प्राधान्य देण्यात येणार असून, सर्व व्यवहार बँकेच्या माध्यमातून केले जाणार आहेत. हा व्यवहार जमीनीचे मालक उद्योजक शिवराज डोके यांच्याशी होणार असून, ते हाऊसिंग सोसायटीचे मुख्य प्रवर्तक राहणार असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. घरकुल वंचितांचा हा प्रकल्प पुर्ण होण्यासाठी अ‍ॅड. गवळी, माजी कुलगुरु सर्जेराव निमसे, कॉ.बाबा आरगडे, अशोक सब्बन, जालिंदर बोरुडे, प्रकाश थोरात, सुधीर भद्रे, वीरबहादूर प्रजापती, शाहीर कान्हू सुंबे आदि प्रयत्नशील आहेत. 



Post a Comment

0 Comments