आरोग्य आहार

आरोग्य आहार 

टोफू चीज पराठा 

साहित्य : टोफू (सोया पनीर), चीज , बारीक चिरलेली ढोबळी मिरची, बारीक चिरलेला कांदा , गरम मसाला, पावभाजी मसाला , तिखट, मीठ , साखर , लिंबू , कोथिंबीर, दिड  कणिक , पाव वाटी डाळीचं  पीठ,ओवा. 

कृती: प्रथम टोफू बारीक कुस्करून घेणें.तेलाची फोडणी करून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा , ढोबळी मिरची टाकून वाफवून घेणे . नंतर त्यामध्ये कुस्करलेला टोफू घालुन एक वाफ आणणे  मग त्यामध्ये गरम मसाला , तिखट , पावभाजी मसाला, मीठ ,साखर, लिंबू पिळून एक वाफ आणणे बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरून भाजी गार करण्यास ठेवणे. 

दिड वाटी कणिक , पाव वाटी डाळीचे पीठ , ओवा , एक चमचा तेल ,चवीपुरते मीठ टाकून कणिक मळून घेणे . १०-२० मिनिटे झाकून ठेवणे . नंतर कणकेची एक छोटी पोळी लाटून सुरीने चौकोन आकार कापून घेणे, त्यावर तयार भाजी पसरवणे , व चीज किसून टाकणे त्यावर तशीच एक चौकोनी पोळी ठेवून चारी बाजूच्या कडा दाबून घेणे . लाटण्याने अलगद फिरवणे. दोन्ही बाजूंनी तूप सोडून गुलाबीसर भाजून घेणे. 

पुदिना कोथिंबिरीच्या चटणी बरोबर सर्व्ह करणे .  

Post a Comment

0 Comments