अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करावे

 

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या 

पिकांचे तातडीने पंचनामे करावे - महेंद्र धांडे

वेब टीम कर्जत : कर्जत तालुक्यात आणि परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्या पिकांचे तातडीने पंचनामे करीत संबंधित शेतकऱ्यास नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष महेंद्र धांडे यांनी तहसिलदार नानासाहेब आगळे आणि तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर यांच्याकडे केली आहे. 

                     कर्जत तालुका आणि परिसरात मागील आठवड्यात मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक गावांत त्या नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यात आली नसल्याने शेतकरीवर्ग चिंतातूर झाला आहे. पाण्यात बुडालेली पिके, उभ्या पिकांना आलेली कोंब पाहता शेतकरीवर्ग हवालदिल झाला असल्याची चित्र पहावयास मिळत आहे. पंचनामे करण्यास होणारी टाळाटाळ यात अधिक भर घालत असल्याने सोमवारी कर्जत तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष महेंद्र धांडे यांनी कोंब आलेली मक्याची कणसे तहसिलदार नानासाहेब आगळे आणि तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर यांना भेट देत शेतकरीवर्गाची भयानक परिस्थिती कथन केली. जर प्रशासनाने पिकांचे पंचनामे तातडीने न केल्यास शेतकरी संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा धांडे यांनी दिला. यावेळी तहसिलदार नानासाहेब आगळे यांनी आपण स्वता उद्या त्या भागातील परिस्थितीचे पाहणी करीत तातडीने पंचनामे करण्याचे आश्वासन दिले. यावेळी रावसाहेब धांडे, सागर देमुंडे, अनिल सावंत, नितीन म्हस्के, नामदेव धांडे, नितीन शेलार, गोटू नेवसे, शहाजी शेळके, आकाश धांडे, भारत धांडे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments