. शहरातील दहा बड्या रुग्णालयांना दणका


शहरातील दहा बड्या रुग्णालयांना दणका 

कोरोना रुग्णांची लूट केल्याबद्दल 

रुग्णालयांना चपराक 

जादा आकारणीची २९ लाख रुपयांची  रक्कम 

 तातडीने परत करण्याचे आदेश 

 नगर वेब टीम : कोरोना  झाल्यानंतर  खासगी रुग्णालयातून रुग्णाची आकारण्यात आलेल्या  बिलाबद्दल तक्रार होती मात्र ,नगर महापालिकेन रुग्णाकडून आकारण्यात आलेल्या जादा पैशाची रक्कम २९ लाख १२ हजार ३९० रुपये रुग्णांना तातडीने परत करण्याचे आदेश दिल्याने  १० रुग्णालयांचे धाबे दणाणले आहेत  मनमानी बिल आकारणीला आ

ळा घातल्याने या रुग्नालयातील प्रशासनाच्या कारभारालाही  चपराक बसली आहे. तातडीने पैसे परत करण्याचे आदेश मनपा आरोग्याधिकारी डॉ . अनिल बोरगे यांनी दिले असून , रुग्णांनापैसे परत मिळावेत यासाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ  आणि जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी  पाठपुरावा केला.

 दरम्यान आकारण्यात आलेली जास्तीची रक्कम सात दिवसांच्या आत रुग्णांच्या  नातेवाईकांच्या खात्यात जमा करावी अन्यथा या रुग्णालयांवर साथ रोग  अधिनियम १८९७ अन्वये कारवाई करण्यात येणार आहे. रुग्णाला जोपर्यंत पैसे परत मिळणार नाहीत तोपर्यंत या प्रकरणाचा पाठ पुरावा सुरू राहणार असल्याचे मनसे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी सांगितले आहे. 

जुन महिन्यापासून नगर शहरात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढली .त्यामुळे सीव्हीहीला ,बूथ मध्ये केलेल्या कोरोना रुग्णांच्या उपचारा साठी केलेल्या सुविधा  अपुऱ्या पडू लागल्याने रुगणांनी खासगी रुग्णालयात धाव घेतली . मात्र तेथे मिळणाऱ्या उपचारांबरोबरच मोठ्या प्रमाणावर आपली लूट झाल्याचेही रुग्नांच्या लक्षात आल्याने संबधीत रुग्णांनी यासंदर्भात  मनसे  कडे तक्रारी केल्याने, मनसे पदाधिकाऱयांनी  याप्रकरणी लक्ष घातले व सातत्याने पाठ पुरावा केला. जिल्हा प्रशासनानेही याप्रकरणाची दाखल घेऊन उपजिल्हाधिकारी स्तरावरील भरारी पथकाची समिती स्थापना केली. या पथकाच्या माध्यमातून बिलांची पडताळणी करून त्याचा अहवाल जिल्हाप्रशासनाकडे दिल्या नंतर त्यांनी शहर विभागाप्रती जबाबदारी मनपा अधिकाऱयांवर  सोपविली . त्यानुसार आयुक्त  श्रीकांत मायकलवार  आदेशाने आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी  संबंधित रुग्नालयाना बजावले .येत्या  पैसे रुग्णाला  मिळाल्यास बँक स्टेटमेंट  मनपाच्या आरोग्य विभागाकडे जमा  केल्यास या रुग्णालयांवर साथ रोग   अधिनियमानुसार  करण्यात येणार आहे. 

शहरातील प्रतिथयश रुग्णालयांवर कारवाई करण्यात आल्याने त्यांचे  दणाणले असून त्यामध्ये फाटके हॉस्पिटल, साईदीप ,सुरभी,   लाईफलाईन ,सिटीकेअर ,प्रणव,विघ्नहर्ता ,स्वास्थ्य ,व पतियाळाहाऊस आदी हॉस्पिटल व कोविड  सेंटरआदींचा समावेश   आहे.                                

Post a Comment

0 Comments