सामाजिक संस्थांच्या आधारामुळे करोनाची भीती कमी झाली

 सामाजिक संस्थांच्या आधारामुळे 

करोनाची भीती कमी झाली

डॉ. सुदर्शन गोरे : शिववरद प्रतिष्ठानचा जागर स्त्री शक्तीचा उपक्रम

वेब टीम नगर –  गेल्या आठ महिन्यापासून आलेल्या करोनामुळे लाखोंच्या संख्येने नागरिक बाधित झाले आहेत. त्यामुळे आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. डॉक्टरांनी आपापल्यापरीने सेवा देण्याचे काम केले आहे. मात्र करोना व लॉकडाऊन मुळे घाबरलेल्या नागरिकांना खरा आधार सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांनी दिले. त्यात शिववरद प्रतिष्ठानचे कार्य आदर्शवत झाले आहे. किशोर डागवाले यांनी सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरा मुळे रुग्णांना चांगले उपचार मिळून डॉक्टरांनीही रुग्णसेवा करण्याची संधी मिळाली आहे, असे प्रतिपादन दंत चिकित्सक डॉ. सुदर्शन गोरे यांनी केले.

शिववरद प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्र उत्सवातील सर्व धर्मिक कार्यक्रम रद्द करून सध्याच्या करोनाच्या संकट काळात नागारीकांचे आरोग्य निरोगी राहावे यासाठी महाले मंगल कार्यालयात जागर स्त्रीशक्तीच्या उपक्रमांतर्गत मोफत सर्वरोग निदान शिबीर, उपाचर व सवलतीच्या दारात शस्त्रक्रिया तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे उत्घाटन जेष्ठ महिला रुग्णाच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. गोरे बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक व प्रतिष्ठानचे संस्थापक किशोर डागवाले, अध्यक्ष नितीन डागवाले, सचिव सागर गोरे, उपाध्यक्ष मंदार पळसकर, खजिनदार सचिन भिंगारकर, जेष्ठनागरिक संघाचे सुभाष दारवेकर, जालिंदर बोरुडे, डॉ. महाले आदींसह प्रतिष्ठान चे सदस्य, उपचार करणारे तज्ञ डॉक्टर व रुग्ण उपस्थित होते.

            यावेळी बोलतांना किशोर डागवाले म्हणाले, शिववरद प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या तीन वर्षापासून प्रभागातील नागरिकांचे आरोग्य सदृढ राहण्यासाठी विविध आजारांवर तज्ञांकडून अत्यल्प दारात चांगल्या वैद्यकीय सुविधा औषधोपचार मिळण्यसाठी कै.स्वा.सै. मोहनराव दारवेकर दवाखाना चालवण्यात येत आहे. करोना अजून संपलेला नाहीये अशा परिस्थितीत सर्वच नागरिकांना विविध आजारांवर वैद्यकीय उपचार घ्यावे लागत आहेत. मात्र सर्वसामान्य नागरिक अद्यापही करोना व लॉकडाऊन मुळे आर्थिक संकटात आहेत. अश्या परिस्थितीत शिववरद प्रतिष्ठानने करोनाचे संकट आल्यापासून सुरु केलेले विविधप्रकारचे मदत कार्य अद्यापही चालू आहे. डॉक्टरांनी केलेल्या चांगल्या सेवेमुळे आज करोनाची लाट कमी झाली आहे. शिववरद प्रतिष्ठानच्या या आरोग्य शिबिरात चांगल्या तज्ञ डॉक्टरांची टीम रुग्णांवर सर्वप्रकारचे उपचार करणार आहेत.

            यावेळी शिववरद प्रतिष्ठानचे राजेश भरेकर, रोहन डागवाले, अनिल शिंदे, अॅड. सुनील सूर्यवंशी, बाबासाहेब वैद्य, सचिन सप्रे, शहाजी डफळ, विकास आव्हाड, महेश शिरसाठ, मुशीर बागवान, रवी दंडी, उपचार करणारे डॉ. सतीश राजूरकर, डॉ.स्नेहलकुमार रहाणे, डॉ. दीपा मोहळे, डॉ. भाग्यश्री धारस्कर, डॉ.अक्षय भुसे, डॉ. अश्विनी जपकर, डॉ. जयदीप कोळगे, डॉ. अजित घुमरे, डॉ. सुदर्शन गोरे, डॉ. श्रीकांत पाठक आदी तज्ञ डॉक्टर उपस्थित होते.

या शिबिरात के.के.आय. बुधराणी हॉस्पिटल व आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या सहकार्याने मोफत नेत्र व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरांचेही आयोजन करण्यात आले आहे. तसेच अत्यल्प दारात उपचार होणार आहेत. यात मुळव्याध, अॅपेंडिक्स, शरीरातील गाठी काढणे या शस्त्रक्रिया ५०% सावलीतीच्या दरात होणार आहे. रक्त लाघवी तपासणीत 50% सूट,  केवळ ५०० रु. सोनोग्राफी, डोळ्यांच्या शस्त्रक्रिया ५०% सावलीतीच्या दरात, तसेच जुनाट व्याधींवर आयुर्वेदिक उपचार व पंचकर्म चिकित्सा विशेष ५०% सावलीतीच्या दरात करून रोग प्रतिकार वाढण्यासाठी १०  दिवसांचे आयुर्वेदिक औषधे मोफत देण्यात येणार आहेत.


Post a Comment

0 Comments