विडी कामगार युनियनची नुतन कार्यकारणी जाहीर

विडी कामगार युनियनची नुतन कार्यकारणी जाहीर


अध्यक्षपदी कॉ. उगळे, सचिवपदी अ‍ॅड. टोकेकर, उपाध्यक्षपदी न्यालपेल्ली व खजिनदारपदी दौंड यांची निवड

वेब टीम नगर : विडी कामगार युनियन लाल बावटा (आयटक) ची वार्षिक बैठक श्रमिक नगर येथे पार पडली. महाराष्ट्र राज्य विडी कामगार फेडरेशनचे अध्यक्ष कॉ. कारभारी उगळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकित नुतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

बैठकीच्या प्रारंभी संघटनेचे दिवंगत सचिव कॉ. शंकरराव न्यालपेल्ली यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. विडी कामगार युनियन लाल बावटा (आयटक) च्या अध्यक्षपदी कॉ. कारभारी उगळे, सचिवपदी अ‍ॅड.कॉ. सुधीर टोकेकर, उपाध्यक्षपदी कॉ. भारती न्यालपेल्ली, खजिनदारपदी अंबादास दौंड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर बैठकित कोरोनाच्या संकटकाळात विडी कामगारांची खालवलेली आर्थिक परिस्थिती, शासनाकडून विडी कामगारांना कुठल्याही प्रकारे न मिळालेली आर्थिक मदत, भविष्यात विडी कामगारांना संरक्षण व ५ हजार पेन्शन मिळण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.  कॉ.न्यालपेल्ली यांनी विडी कामगारांचे चांगले संघटन केले आहे. त्यांच्या निधनानंतर ही चळवळ पुढे चालवून विडी कामगारांना न्याय, हक्क मिळवून देण्यासाठी कटिबध्द राहणार असल्याचे कॉ. कारभारी उगळे यांनी सांगितले. अ‍ॅड. सुधीर टोकेकर यांनी विडी कामगारांचे प्रलंबीत प्रश्‍न सोडविण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला जाणार असल्याचे स्पष्ट केले. संघटनेच्या कार्यकारणी सदस्यपदी शोभा बिमन, शारदा बोगा, सुमित्रा जिंदम, कमलाबाई दोंता, लक्ष्मीबाई कोटा, लक्ष्मी न्यालपेल्ली, शोभा पासकंटी, संगीता कोंडा, सगुना श्रीमल, भाग्यलक्ष्मी गड्डम यांची तर निमंत्रीत सदस्य म्हणून ताराबाई दासर, लक्ष्मीबाई आडेप, निर्मला न्यालपेल्ली, रेणुका अंकारम, शशीकला कोंडा या महिलांची निवड करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments