कर्जत तालुक्यात नवीन पर्व आणि खोटे सर्व अशी परिस्थिती

 कर्जत तालुक्यात नवीन पर्व आणि खोटे सर्व अशी परिस्थिती 


माजीमंत्री राम शिंदे: महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिम्मित कर्जत तालुक्याने काय कमावले आणि काय गमावले

 पत्रकार परिषदेत राम शिंदेची आ.  रोहित पवारांवर घणाघाती टीका

वेब टीम कर्जत : आपल्या कार्यकाळात कर्जत तालुक्यात अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागले होते. यासह अनेक विकासकामे पूर्णत्वाच्या मार्गावर होते. लोकशाही निवडणुकीत आपला पराभव झाला. आणि त्याच विकासकामाना विद्यमान आमदार यांनी खीळ घातली. सध्या मतदारसंघात "नवीन पर्व आणि खोटे सर्व" अशी परिस्थिती झाली आहे अशी घणाघाती टीका माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी आ रोहित पवार यांचे नाव न घेता केली. ते कर्जत येथे महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्ती निम्मित कर्जत तालुक्याने काय कमावले आणि काय गमावले या पत्रकार परिषदेत बोलत होते. 

यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर, तालुकाध्यक्ष डॉ सुनील गावडे, किसान मोर्च्याचे सुनील यादव, माजी जिल्हा परिषद सदस्य शांतीलाल कोपनर, कृषी उत्पन्न समितीचे श्रीधर पवार, प्रसिद्धी प्रमुख सचिन पोटरे यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

         यावेळी पुढे बोलताना प्रा राम शिंदे म्हणाले की, एका वर्षात सर्वसामान्य जनतेचा, कार्यकर्त्यांचा आणि दोन्ही तालुक्यातील विकासकामाचा मोठा हिरमोड झाला आहे. आपल्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात तालुक्यात अनेक महत्वाची कामे मार्गी लागली. या विकासकामासाठी मोठा निधी उपलब्ध करीत ते पूर्ण केले होते. तर काही कामे पूर्णत्वाच्या मार्गावर होती. मात्र मागील निवडणुकीत आपला दुर्दैवी पराभव झाला आणि तालुक्यातील विकासकामांना खीळ घालण्याचे काम विद्यमान आ रोहित पवार यांनी केले. तालुक्यातून कोंभळी -कर्जत मार्ग असेल यासह अमरापूर - भिगवण रस्ता तात्काळ पूर्ण करण्यात आ पवार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. यासह मिरजगाव आणि तालुक्यातील २१ गावासाठी वरदान असणारी तुकाई चारीचे काम पूर्णत्वास नेण्यात आली नाही. वास्तविक पाहता ही कामे आपल्या कार्यकाळात प्रगती पथावर होती ती कार्य पुढे नेण्याचे काम विद्यमान आमदारांचे असताना केवळ राजकीय स्वार्थासाठी त्याला खीळ घालण्याचे काम पवार यांनी केले. कोरोना काळात केंद्राने विविध योजनाद्वारे लोकाभिमुख कार्य केले. मात्र या राज्य सरकारला ते सुद्धा व्यवस्थित पार पडले नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल. सध्या अतिवृष्टीने शेतकरीवर्ग मेटाकुटीस आला असून आजमितीस अनेक गावांत त्या नुकसानीचे पंचनामे करण्यात हे सरकार आणि प्रशासन अपयशी ठरले आहे. फक्त फसव्या घोषणा करण्यात राज्य सरकार आणि या भागाचे लोकप्रतिनिधी सर्वसामान्य लोकांची दिशाभूल करीत असल्याचे राम शिंदे यांनी स्पष्ट केले. तालुका क्रीडा संकुलबाबत आ पवार यांनी तालुक्यातील क्रीडा शौकीनाची घोर निराशा केली.  

         आपल्या कार्यकाळात कर्जत नगरपंचायतीला १० कोटीचे विकासकामे देण्यात आले होते. ते काम इतर ठिकाणी वर्ग करण्याचा घाट आ पवार यांनी केले. कर्जत तालुक्याचा अस्मितेचा प्रश्न असणारा एसटी डेपो आणि एमआयडीसीचा शब्द निवडणूक काळात आणि निवडून आल्यानंतर जनतेला दिला होता. त्याचे पुढे काय झाले असा प्रश्न उपस्थित करीत फक्त निवडणूक जवळ आल्यावर आश्वासनांचा पाऊस देण्याचे काम पवार कुटुंबीयांनी चांगले जमते असा आरोप शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला. मिरजगाव ते उकरी नदी रस्त्याचे अस्तरीकरण करण्यात आले होते ते थोड्याच दिवसात उखडले त्या ठेकेदारावर कोणतीही कारवाई विद्यमान आमदार यांनी का केली नाही. उलट नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला त्यावेळी त्याला काळ्या यादीत टाकेल असे आश्वासन दिले ते देखील पवार यांनी पाळले नाही ही खरी शोकांतिका आहे. तसेच काळया यादीत असणारे ठेकेदार यांना काम देण्याचा घाट केला. माळढोक प्रश्न आपण सोडविला त्यास आ.  पवार यांनी पुढे नेला नाही त्यामुळे त्या भागातील शेतकर्च मोठे नुकसान झाले असल्याचे राम शिंदे यांनी स्पष्ट केले. कर्जतचे विकासकामे आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे काम आ पवार यांनी मात्र या एका वर्षात व्यवस्थित पार पाडले. त्यामुळे या एका वर्षात कर्जत- जामखेडने फार गमावले आहे असे ते म्हंटले. ते कार्यक्रमात म्हणतात की कोरोना महामारी आल्याने आपल्याला अनेक ठिकाणी विकासकामे करता आली नाही या प्रश्नावर माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी परखड उत्तर देत याच कोरोना काळात अंबालिका कारखान्यात १५ कोटीचे काम झाले त्यावेळी कोरोना काळ नव्हता का ? ते कामे याच काळात झाले आहे ना ? तेथे त्यांना कोरोना आडवा नव्हता असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील निशाणा साधला.

     यावेळी नगरसेविका राखी शहा, मनीषा वडे, आरती थोरात, माजी ग्रामपंचायत सदस्य अमृत काळदाते, सरपंच काकासाहेब धांडे, युवक नेते गणेश क्षीरसागर, तात्यासाहेब माने, बापूसाहेब शेळके, उमेश जेवरे, नंदलाल काळदाते यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 

 विद्यमान आमदारांच्या घरचे सरकार

                टपरीधारकांचे पुनर्वसन करू असे आश्वासन कर्जत शहरातील गाळेधारकांना आ पवार यांनी दिले होते. मात्र आज घरचे सरकार असून सुद्धा ते पाळले नाही. मागील काळात विकासाचे काम सुरू होते त्यास ब्रेक देण्याचे काम या नव्या पर्वाने केले आहे. तसेच कुकडीचे पाणी नियमित देण्यात आ पवार अपयशी ठरले. 

 कर्जत नगरपंचायत पुन्हा भाजपाच्याच ताब्यात राहील असा विश्वास माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. निवडणूक जवळ आले की पवार कुटुंबीय कामाला लागते. लोकांना वचन आणि आश्वासने दिली जाते वास्तविक परिस्थितीमध्ये ती पाळली जात नाही याची जनतेने पाहणी करावी. यासह निवडणूक जवळ आल्यावर त्यांनी अनेक कार्यक्रमे घेतली बेरोजगार आणि महिलांना विकासाचे गाजर दाखविले. त्यातील किती लोकांना कामे दिली ? असा प्रश्न उपस्थित करत पवार यांच्या कार्यक्रमावर राम शिंदे यांनी शरसंधान साधले.


 बारामती पॅटर्न मतदारसंघासाठी मृगजळ

        निवडणुकीच्या काळात कर्जत जामखेड मतदारसंघात बारामती पॅटर्न राबवून विकास केला जाईल असे आश्वासन सर्वसामान्य जनतेला दिले गेले. मात्र निवडून आल्यानंतर तेच बारामती पॅटर्न व्यवासायिक पॅटर्न बनले. बारामती अग्रोच्या नावाखाली आ पवार यांनी मतदारसंघाला व्यवसायाचे केंद्र बनविल्याचा आरोप माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी केला. मतदारसंघात पिठाची गिरणी, पॅड, चॉकलेट, बिस्कीट पुडे, झाडे वाटत लोकांना भुरळ घालत आपला व्यवसाय केला. विकासाचे बारामती पॅटर्न कर्जत जामखेडकरासाठी फसवा आणि मृगजळच ठरला हे त्याच्या एका वर्षाच्या कार्यकाळात दिसून आले असल्याची टीका केली. 

Post a Comment

0 Comments