।। जागर शक्तीचा ।। जागर कर्तृत्वाचा ।।
कष्टाची पर्वा न करता आयुष्यात स्थिरावू पाहणारी जिद्दी महिला
सुलभा सटाणकर या पत्रकार राजेश सटाणकर यांच्या पत्नी एवढीच त्यांची ओळख पुरेशी नाही, तर पोरसवदा वयात लग्न करून सासरी आल्यानंतर जिद्दीने शालेय शिक्षण पूर्ण करणाऱ्या, पतीच्या व्यवसायात हिरीरीने सहभागी होणाऱ्या आणि पुढे समाजाच्या महिलांचे संघटन करणाऱ्या अश्या विविध भूमिका घेऊन त्या समाजात वावरत असतात.
शालेय वयात लग्नगाठ बांधल्या गेल्यानं त्या नगरला सासरी आल्या पतीची संमत्ती मिळवून त्या त्यांच्या पाठिंब्यानेच पार्वतीबाई डहाणूकर कन्या विद्यालयात अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी आठवीत प्रवेश घेऊन शिक्षण पूर्ण ठेवलं. त्याच बरोबर पतीच्या साप्ताहिकासाठी परिचितांकडून वर्गणी,जाहिराती गोळा करायच्या. साप्ताहिकासाठी जाहिराती मिळवणे किती जिकिरीचं असतं ते त्यांनी अनुभवलं.मात्र जिद्द आणि चिकाटी सोडली नाही एव्हाना दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले होते. हळू हळू त्यांचा साप्ताहिक सिटी टाइम्स आणि मासिक ऋणानुबंधच्या व्यवसायात सहभाग वाढला. नंतर मुद्रित शोधनाचे कामही त्यांनी शिकून घेतले. घरातली सर्व कामे उरकल्यानंतर वर्गणीदार जाहिरातदार यांच्याकडे जायचे आणि संध्याकाळी परत वृत्तपत्र व्यवसायाच्या तांत्रिक बाजू सांभाळायच्या असा त्यांचा दिनक्रम असायचा. हा सारा प्रवास त्या सायकलवर करायच्या. १९८७ ते ९१ च्या दरम्यान १०वि १२वीचे निकाल वर्तमान पात्रांना आदल्याच दिवशी मिळायचा त्या काळात अर्बन बँक चौकात निकाल पाहण्यासाठी प्रचंड गर्दी असायची १ रुपया घ्यायचा आणि मुलांना निकाल सांगायचा त्यानंतर दुपारी निकालाचे सविस्तर वृत्त साप्ताहिकात प्रसिद्ध करायचं. एके वर्षी त्या या कामात मग्न असताना नात्याने सासरे असणाऱ्या अंबरनाथच्या नातेवाईकाने बघितले, त्यांना कौतुक वाटलं निकालाचे पुस्तक त्यांनी राजेशच्या हातात देऊन सुलभाला घेऊन मिठाईच्या दुकानात घेऊन गेले. गप्पांच्या ओघात ते सुलभाला म्हणाले "तू या घराण्याची वेगळी सून आहेस प्रतिकूल परिस्थितीतही सामाजिक वसा जपत वर्तमानपत्र चालवणं आणि सचोटीने व्यवसायही करणं आणि या अवस्थेत कस जमतं?" या वेळी सुलभा गर्भवती होत्या.
छोटा वर्तमान पत्राच्या व्यवसायातून प्रपंच चालवणं अत्यंत कठीण काम. प्रपंचाही जबाबदारी पार पडताना आर्थिक घडी सुरळीत व्हावी ह्यासाठी स्क्रीन प्रिंटिंग च प्रशिक्षण घेऊन जोड व्यवसाय केला प्रसंगी डॉ. बडवे हॉस्पिटल, व्हिडीओकॉन कंपनीत नौकरी केली, बँका आणि पतसंस्थांच्या दैनंदिन बचत प्रतिनिधी म्हणूनही त्यांनी काम केलं.
२००४ मध्ये सटाणकर कुटुंब एम.आय.डी.सी मध्ये राहायला गेले तिथेही स्क्रीन प्रिंटिंग बरोबर किराण्याचे दुकान आणि पीसीओ एस.टी.डी चा व्यवसाय केला. व्यवसायात घडी बसते न बसते तोच त्यांना रहाती जागा सोडावी लागली मग कुटुंब बागरोजा हडकोत रहायला आले. काही ना काही करण्याची धडपड असणाऱ्या सुलभा सटाणकर यांनीवस्ती गृहातील मुलींना जेवणाचे डब्बे देण्यास सुरवात केली त्या बरोबरच घरगुती मेसही सुरु केली. जेवणाचीच एक चव चाखल्यावर टोयाटो कंपनीचं कॅंटीनचे कॉन्ट्रॅक्ट त्यांना मिळालं २०१९ पर्यंत हॉटेलचा व्यवसायही केला सुरवाती पासूनच जीवनातल्या अनेक चढ उतारांना तोंड देत परिस्थितीशी झगडण्याचा कणखर पणा त्यांनी अंगी बाणवला.
व्यवसायिक जबाबदाऱ्या सांभाळतांना दोन्ही मुलांचं केलं , प्रापंचिक जबाबदाऱ्या समर्थपणे पेलताना माहेरच्या कुटुंबाची जबाबदारीही उचलली. वडिलांच्या मृत्यूनंतर आई बहिणींना नगरला आणून त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले. बहिणींच्या शिक्षण , लग्न कार्यात हातभार लावला आजही सगळ्या जणी संपर्कात राहून एकमिकांना सहकार्य करतात. एवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत नाभिक समाजातील महिला मंडळाची स्थापना त्यांनी केली त्यांचा बचत गट त्यांनी उभा केला . समाजात महिलांचे संघटन उभे करण्याचा हा त्यांचा पहिलाच प्रयत्न होता. त्यानंतर समाजाने महिलांना पदे देऊ केली. सुरवातीच्या काळात पुरुषांच्या नाराजीला सामोरं जावं लागलं. मात्र नंतर प्रत्येक संघटनेने ह्याची दाखल घेत आज प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात महिलांचे संघटन सुरु आहे. सुलभ सटाणकरांच्या कामाचीच हि पावती म्हणावी लागेल.
आज त्या विशेष कार्यकारी अधिकारी नाभिक समाजाच्या महिलामंडळाध्यक्षा , संत सेना प्रतिष्ठानच्या विश्वस्थ साप्ताहिक सिटी टाइम्सच्या संचालिका व कार्यकारी संपादिका म्हणून त्या कार्यरत आहेत. प्रेस क्लब, देवदासी संघटना , अस्मिता वाङ्मय मंच अशा सामाजिक संस्थांमध्येही त्यांचा समावेश असतो. महिला मंडळाच्या माध्यमातून रक्तदान शिबिरे , रुग्णांना मदत , कवी संमेलन , साहित्य संमेलनात सहभाग अशी त्यांची वाटचाल सुरु आहे. त्यांच्यातील संघटन कौशल्य आणि उद्योजिकेचे गुण हेरून पर्यटन समितीनेही त्यंवची दाखल घेत आदर्श महिला म्हणून तत्कालीन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला.
खडतर वाटचालीतही न डगमगता मार्ग क्रमानं करणाऱ्या सुलभा सटाणकर यांचे नगर टुडे परिवाराला विशेष कौतुक आहे. सुलभा सटाणकर या पत्रकार राजेश सटाणकर यांच्या पत्नी एवढीच त्यांची ओळख पुरेशी नाही, तर पोरसवदा वयात लग्न करून सासरी आल्यानंतर जिद्दीने शालेय शिक्षण पूर्ण करणाऱ्या, पतीच्या व्यवसायात हिरीरीने सहभागी होणाऱ्या आणि पुढे समाजाच्या महिलांचे संघटन करणाऱ्या अश्या विविध भूमिका घेऊन त्या समाजात वावरत असतात.
शालेय वयात लग्न बांधल्या गेल्यानं त्या नगरला सासरी आल्या पतीची संमत्ती मिळवून त्या त्यांच्या पाठिंब्यानेच पार्वतीबाई डहाणूकर कन्या विद्यालयात अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी आठवीत प्रवेश घेऊन शिक्षण पूर्ण ठेवलं. त्याच बरोबर पतीच्या साप्ताहिकासाठी परिचितांकडून वर्गणी,जाहिराती गोळा करायच्या. साप्ताहिकासाठी जाहिराती मिळवणे किती जिकिरीचं असतं ते त्यांनी अनुभवलं.मात्र जिद्द आणि चिकाटी सोडली नाही एव्हाना दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले होते. हळू हळू त्यांचा साप्ताहिक सिटी टाइम्स आणि मासिक ऋणानुबंधच्या व्यवसायात सहभाग वाढला. नंतर मुद्रित शोधनाचे कामही त्यांनी शिकून घेतले. घरातली सर्व कामे उरकल्यानंतर वर्गणीदार जाहिरातदार यांच्याकडे जायचे आणि संध्याकाळी परत वृत्तपत्र व्यवसायाच्या तांत्रिक बाजू सांभाळायच्या असा त्यांचा दिनक्रम असायचा. हा सारा प्रवास त्या सायकलवर करायच्या. १९८७ ते ९१ च्या दरम्यान १०वि १२वीचे निकाल वर्तमान पात्रांना आदल्याच दिवशी मिळायचा त्या काळात अर्बन बँक चौकात निकाल पाहण्यासाठी प्रचंड गर्दी असायची १ रुपया घ्यायचा आणि मुलांना निकाल सांगायचा त्यानंतर दुपारी निकालाचे सविस्तर वृत्त साप्ताहिकात प्रसिद्ध करायचं. एके वर्षी त्या या कामात मग्न असताना नात्याने सासरे असणाऱ्या अंबरनाथच्या नातेवाईकाने बघितले, त्यांना कौतुक वाटलं निकालाचे पुस्तक त्यांनी राजेशच्या हातात देऊन सुलभाला घेऊन मिठाईच्या दुकानात घेऊन गेले. गप्पांच्या ओघात ते सुलभाला म्हणाले "तू या घराण्याची वेगळी सून आहेस प्रतिकूल परिस्थितीतही सामाजिक वसा जपत वर्तमानपत्र चालवणं आणि सचोटीने व्यवसायही करणं आणि या अवस्थेत कस जमतं?" या वेळी सुलभा गर्भवती होत्या.
छोटा वर्तमान पत्राच्या व्यवसायातून प्रपंच चालवणं अत्यंत कठीण काम. प्रपंचाही जबाबदारी पार पडताना आर्थिक घडी सुरळीत व्हावी ह्यासाठी स्क्रीन प्रिंटिंग च प्रशिक्षण घेऊन जोड व्यवसाय केला प्रसंगी डॉ. बडवे हॉस्पिटल, व्हिडीओकॉन कंपनीत नौकरी केली, बँका आणि पतसंस्थांच्या दैनंदिन बचत प्रतिनिधी म्हणूनही त्यांनी काम केलं.
२००४ मध्ये सटाणकर कुटुंब एम.आय.डी.सी मध्ये राहायला गेले तिथेही स्क्रीन प्रिंटिंग बरोबर किराण्याचे दुकान आणि पीसीओ एस.टी.डी चा व्यवसाय केला. व्यवसायात घडी बसते न बसते तोच त्यांना रहाती जागा सोडावी लागली मग कुटुंब बागरोजा हडकोत रहायला आले. काही ना काही करण्याची धडपड असणाऱ्या सुलभा सटाणकर यांनीवस्ती गृहातील मुलींना जेवणाचे डब्बे देण्यास सुरवात केली त्या बरोबरच घरगुती मेसही सुरु केली. जेवणाचीच एक चव चाखल्यावर टोयाटो कंपनीचं कॅंटीनचे कॉन्ट्रॅक्ट त्यांना मिळालं २०१९ पर्यंत हॉटेलचा व्यवसायही केला सुरवाती पासूनच जीवनातल्या अनेक चढ उतारांना तोंड देत परिस्थितीशी झगडण्याचा कणखर पणा त्यांनी अंगी बाणवला.
व्यवसायिक जबाबदाऱ्या सांभाळतांना दोन्ही मुलांचं केलं , प्रापंचिक जबाबदाऱ्या समर्थपणे पेलताना माहेरच्या कुटुंबाची जबाबदारीही उचलली. वडिलांच्या मृत्यूनंतर आई बहिणींना नगरला आणून त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले. बहिणींच्या शिक्षण , लग्न कार्यात हातभार लावला आजही सगळ्या जणी संपर्कात राहून एकमिकांना सहकार्य करतात. एवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत नाभिक समाजातील महिला मंडळाची स्थापना त्यांनी केली त्यांचा बचत गट त्यांनी उभा केला . समाजात महिलांचे संघटन उभे करण्याचा हा त्यांचा पहिलाच प्रयत्न होता. त्यानंतर समाजाने महिलांना पदे देऊ केली. सुरवातीच्या काळात पुरुषांच्या नाराजीला सामोरं जावं लागलं. मात्र नंतर प्रत्येक संघटनेने ह्याची दाखल घेत आज प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात महिलांचे संघटन सुरु आहे. सुलभ सटाणकरांच्या कामाचीच हि पावती म्हणावी लागेल.
आज त्या विशेष कार्यकारी अधिकारी नाभिक समाजाच्या महिलामंडळाध्यक्षा , संत सेना प्रतिष्ठानच्या विश्वस्थ साप्ताहिक सिटी टाइम्सच्या संचालिका व कार्यकारी संपादिका म्हणून त्या कार्यरत आहेत. प्रेस क्लब, देवदासी संघटना , अस्मिता वाङ्ममय मंच अशा सामाजिक संस्थांमध्येही त्यांचा समावेश असतो. महिला मंडळाच्या माध्यमातून रक्तदान शिबिरे , रुग्णांना मदत , कवी संमेलन , साहित्य संमेलनात सहभाग अशी त्यांची वाटचाल सुरु आहे. त्यांच्यातील संघटन कौशल्य आणि उद्योजिकेचे गुण हेरून पर्यटन समितीनेही त्यंवची दाखल घेत आदर्श महिला म्हणून तत्कालीन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला.
खडतर वाटचालीतही न डगमगता मार्गक्रमण करणाऱ्या सुलभा सटाणकर यांचे नगर टुडे परिवाराला विशेष कौतुक आहे.
0 Comments