सुखद बातमी : कपिल देव यांची प्रकृती धोक्याबाहेर

सुखद बातमी...

कपिल देव यांची प्रकृती धोक्याबाहेर 

वेब टीम नवी दिल्ली : भारताला १९८३ मध्ये पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकून देणारे माजी क्रिकेटपटू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. कपिल देव यांना राजधानी दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तेथे त्यांची अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया सुरू आहे. कपिल देव सध्या ६१ वर्षांचे आहेत.

 कपिल देव यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांशी संवाद साधला आहे. त्यांनी सांगितले आहे की आता कपिल देव यांची प्रकृती स्थिर असून त्याच्यावरील धोका टळला आहे.


 

कपिल देव यांनी १३१ कसोटीत आठ शतके आणि २७ अर्धशतकांच्या मदतीने ५२४८ धावा केल्या आहेत. कसोटी सामन्यात त्यांची सर्वाधिक धावसंख्या १६३ राहिली आहे. त्याचबरोबर कपिल देव यांनी २२५ एकदिवसीय सामन्यात एक शतक आणि १४ अर्धशतकांच्या मदतीने ३७८३ धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात त्याची सर्वाधिक धावसंख्या  नाबाद १७५ होती. 

कपिल देव यांनी १३१ कसोटीत ४३४ बळी घेतले आहेत. कपिल यांनी पहिला कसोटी सामना १६ ऑक्टोबर १९७८ रोजी खेळला होता. त्यांनी २२५ एकदिवसीय सामन्यात २५३ बळी घेतले आहेत. तर १ ऑक्टोबर १९७८ मध्ये कपिल यांनी पाकिस्तानविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला होता.पसकिस्तान विरुद्ध च्या सामन्यात कपिल देव यांची आंतरराष्ट्रीय  झाली , आपल्या पदार्पणातील पहिल्याच चेंडूवर त्यांनी षटकार मारला यावेळी प्रेक्षकांनी स्टेडियम अक्षरशः डोक्यावर घेतले होते. 




Post a Comment

0 Comments