आरोग्य आहार

आरोग्य आहार

उपवास मिक्स व्हेज रायता

साहित्य: एक उकडलेला बटाटा, एक मध्यम आकाराचे उकडलेले रताळे, एक वाटीभर लाल भोपळ्याच्या उकडलेल्या फोडी, हिरवी राजगिरा ची भाजी धुवून बारीक चिरलेली वाटीभर, एक चमचा हिरवी मिरची पेस्ट, आले, जिरेपूड, मीठ, ताजे गोड दही एक वाटी, फोडणीसाठी दोन चमचे तेल( छोटे चमचे). 

कृती: प्रथम एका बाऊलमध्ये उकडलेला बटाटा, उकडलेले रताळे, उकडलेला भोपळा बारीक करून घ्यावा. त्यामध्ये बारीक चिरलेली राजगिरा ची भाजी टाकून चांगले मिक्स करून घेणे. त्यानंतर त्यामध्ये आले-मिरची पेस्ट, जिरेपूड, मीठ, दही टाकून चांगले मिक्स करून घेणे. लाल भोपळा असल्यामुळे साखरेची गरज भासत नाही.दोन छोटे चमचे तेलामध्ये जिरे टाकून फोडणी करून घेणे वरील मिश्रणात ढाकणे. दही ऐवजी लिंबू सुद्धा वापरू शकता.


पोषणमूल्ये: रताळ्या मधील बी सिक्स, फायबर राजगिरा मधील कॅल्शियम फॉलिक ऍसिड लाल भोपळा मधील विटामिन ए यामुळे रायते खूप पौष्टिक चवदार बनते.

अनुपमा वैभव जोशी : ९४०४३१८८७५

* Dietitian and Nutritionist 

* B.Sc in Food Science and Nutrition 

* Diploma in Nutrition and Health Education

* Diploma in Yog Shikshak

Post a Comment

0 Comments