कोरोनाची भिती न बाळगता सर्वांनी रक्तदान करावे

 कोरोनाची भिती न बाळगता सर्वांनी रक्तदान करावे

 भगवान फुलसौंदर: ५७ रक्तपिशव्यांचे संकलन 

   वेब टीम  नगर: आज कोरोनाने सर्वत्र थैमान घातले आहे, अशा परिस्थिती इतर आजारांबाबतही जागरुक राहणे आवश्यक आहे. गेल्या सहा महिन्यांपासून सुरु असलेल्या या कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे रक्तदानाचे प्रमाण घटले आहे, त्यामुळे गरजू रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासत आहे. ही गरज ओळखून रक्तदान शिबीराच्या माध्यमातून ही गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढेही सामाजिक दायित्व जपून सर्वांनी रक्तदान करण्यासाठी पुढे आले पाहिजे. आपण केलेल्या रक्तदानामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात. त्यासाठी रक्तदान आवश्यक आहे. सध्या रक्तदान करतांनाही काळजी घेतली जात असल्याने कोरोनाची भिती न बाळगता सर्वांनी रक्तदान करावे, असे आवाहन माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी केले.

     नगर शहर शिवसेना, नक्षत्र प्राणायम ग्रुप, मोरया ग्रुप, फुलसौंदर मळा, संकल्प ग्रुप, साई सिंडीकेट ग्रुप यांच्यावतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, बाबूशेठ टायरवाले, शहरप्रमुख दिलीप सातपुते, भाजप शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, विक्रम राठोड, अभिषेक कळमकर, बाळासाहेब बोराटे, सदा देवगांवकर, सुधीर पगारिया, विष्णू फुलसौंदर, अनिल शिंदे, संजय शेंडगे, संभाजी कदम, शरद झोडगे, संदेश कार्ले, प्रा.माणिकराव विधाते, अमित खामकर आदि उपस्थित होते.

     पुढे बोलतांना भगवान फुलसौंदर म्हणाले, आपण नेहमीच सर्वसामान्यांच्या मदतीला धावून गेलेली आहोत.  समाजातील प्रश्‍नांसाठी लढा दिला आहे. हीच शिकवण आचारणात आणून आज रक्ताची गरज भासल्यानंतर लगेचच रक्तदान शिबीराचे आयोजन करुन रक्तदान घडवून आणले आहे. यापुढील काळातही जेव्हा-जेव्हा गरज असलेल तेव्हा-तेव्हा सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांसाठी पुढाकार घेऊ असे सांगितले.

     याप्रसंगी प्रा.शशिकांत गाडे म्हणाले, आज भगवान फुलसौंदर यांनी  राबविलेला रक्तदान शिबीराचा उपक्रम समाजासाठी आदर्शवत असाच आहे. अशा उपक्रमातून सामाजिक एकतेचे दर्शन घडत असते. गरजेच्यावेळी लोकांच्या मदतील धावून जाणे ही खरी माणूसकी आहे. जेथे गरज पडेल तेथे शिवसेना उभी राहील. असा विश्‍वास व्यक्त केला.

      यावेळी भगवान फुलसौंदर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी नगरसेवक सचिन शिंदे, गणेश कवडे, अमोल येवले, अमोल येवले, दत्ता जाधव, शाम नळकांडे, दत्ता कावरे, परेश लोखंडे, संजय चोपडा, संतोष म्हस्के, विशाल वालकर, संग्राम कोतकर, अनिल लोखंडे, प्रा.संजय गारुडकर,  डॉ.सुदर्शन गोरे, अशोक तुपे, निखिल शेलार, महेश शिंदे,  संदिप दातरंगे, ऋषीकेश चाफे, राजु भगत, विजय पठारे, रमेश परतानी, हर्षल म्हस्के, सुनिल राऊत, डॉ.अभय मुथा, सुरेश तिवारी,  गोरख पडोळे, राजेंद्र गांधी, पारुनाथ ढोकळे, अंबादास शिंदे, पोपट लोढा, रघुनाथ केदार, राजेंद्र फुलसौंदर, संजय आव्हाड, जालिंदर बोरुडे, आदि उपस्थित होते.

     रक्त संकलनाचे कार्य अष्टविनायक ब्लड बँकेच्यावतीने करण्यात आले. यासाठी जितेंद्र पलिकुंडवार व टीमचे सहकार्य लाभले. या शिबीरात एकूण ५७ रक्तपिशव्यांचे संकलन झाले. शेवटी सर्वांचे अवधूत फुलसौंदर यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments