अतिवृष्टीने शेतकर्‍यांची खराब झालेली पिके आणून सरकारचे वेधले लक्ष

अतिवृष्टीने शेतकर्‍यांची खराब झालेली

 पिके आणून सरकारचे वेधले लक्ष

आरपीआयचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

वेब टीम नगर - अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना तातडीने मदत जाहीर करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. तर अतिवृष्टीने शेतकर्‍यांची खराब झालेली पिके आणून सरकारचे लक्ष वेधण्यात आले. या आंदोलनात आरपीआयचे युवक शहराध्यक्ष अमित काळे, उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे, शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, अशोक केदारे, विनोद भिंगारदिवे, चंद्रकांत भिंगारदिवे, दया गजभिये, बापू सुर्यवंशी, मंगेश मोकळ, संतोष सारसर, सनी खरारे, प्रविण वाघमारे, राहुल लखन, तालेवर गोहेर, युवराज पाखरे, दिपक गायकवाड, विवेक भिंगारदिवे, रमेश भिंगारदिवे, शफीक मोगल, नरेंद्र तांबोली आदि सहभागी झाले होते.

अतिवृष्टीचा मोठा फटका शेतकर्‍यांना बसला आहे. काही ठिकाणी रस्ते खचली आहे. तर शेतातील पिके अतिरिक्त पावसामुळे वाहून गेली व खराब झाली आहेत. सोयाबीन सारखे पिक शेताच्या बांधावर काढून ठेवले असताना पुराच्या पाण्याने वाहून गेली. कोरोनामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकर्‍यांना ओला दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. पुराचे पाणी शेतात आल्याने संपुर्ण शेत पाण्याखाली गेले आहेत. अनेक ठिकाणी बंधारे देखील वाहून गेले आहेत. अनेक ठिकाणी दुबार पेरणी झाली आहे. सोयाबीन सोबतच मूग, उडीद पीक बर्‍यापैकी आले होते. मात्र जोरदार वादळी पावसामुळे शेतकर्‍यांच्या हातात आलेली पिके कापणी करण्यापुर्वी खराब झाली आहे. कपाशीचे बोंड सडत असून, या नैसर्गिक संकटापुढे शेतकरी हतबळ झाला आहे. शेतकरी एकदा कर्जात बुडाला की, तो पुन्हा या चक्रव्युवहातून बाहेर पडत नाही. केंद्र व राज्य सरकारने कोणत्याही प्रकारे राजकीय द्वेष न ठेवता संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना आधार देण्यासाठी मदत करणे गरजेचे असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.  

विम्याचे पैसे भरुन देखील विमा कंपन्या अनेक त्रुटी काढून शेतकर्‍यांना त्रास देण्याचे काम करीत आहे. पीक विम्याचे पैसे मिळण्यासाठी सरकारने तातडीने तोडगा काढावा, शेतकरी या ओल्या दुष्काळाने उध्वस्त झाला असताना केंद्र व राज्य सरकारने शेतकर्‍यांसाठी भरीव मदत जाहीर करावी, केंद्र व राज्य सरकारने एकमेकांवर जबाबदारी टाकण्यापेक्षा शेतकर्‍यांना आधार द्यावा, ज्या शेतकर्‍यांची कर्ज माफी झाली नाही त्यांना अल्प व्याजदराने तातडीने कर्जपुरवठा उपलब्ध करुन द्यावा, पिकांचे पंचनामे करुन विमा कंपन्याकडून जास्तीत जास्त मदत शेतकर्‍यांना मिळवून देण्याची मागणी आरपीआयच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन नायब तहसिलदार राजेंद्र दिवाण यांना देण्यात आले. 

Post a Comment

0 Comments