।। जागर शक्तीचा ।। जागर कर्तृत्वाचा ।।

।। जागर शक्तीचा ।। जागर कर्तृत्वाचा ।।

उदर भरणं नोहे जाणिजे यज्ञ कर्म 


भारतीय संस्कृतीच्या आहाराचा  पुरस्कार करणाऱ्या अनुपमा जोशी 

हल्लीच्या काळात बदलती जीवन शैली,अधिकाधीक बैठं काम  मुळे वजन कमी करणं हा महत्वाची समस्या डोके वर काढू लागली आहे.त्याला काही अंशी जंक फूड,फास्ट फूड हे हि कारणीभूत आहेत. त्यापासून हा समस्येशी संबंधित आजार ,डायबेटीस , थायरॉईड , आदी बळावू लागले आहेत. आहार घेताना मध्यम मार्ग महत्वाचा. " मॉडरेशन इज द की " असं म्हणलं जातं, शिवाय उदर भरणं नोहे जाणिजे यज्ञ कर्म असं सांगणारी आपली संस्कृती याच  महत्व सांगत आहेत आहार तज्ञ अनुपमा जोशी. 

नवऱ्याला कमी वयात डायबेटीस झाल्याने  खाण्या पिण्याची पथ्य सांगताना डॉक्टरांची निरनिराळी मतं ऐकून पुरत्या गोंधळून गेलेल्या अनुपमा जोशी ह्यांनी स्वतःच डायटेशियन ( आहार तज्ञ ) होण्याचा निर्णय घेतला. मुळात इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स या विषयाच्या अभियंता तेही विशेष प्रावीण्या सह असलेल्या आणि काही काळ फॅशन डिझायनर म्हणून काम केलेल्या अनुपमा जोशींनी थेट सिम्बायोसिस गाठलं आणि तिथे इंदीरा गांधी विद्यापीठातून आहार तज्ञ होण्या विषयीच्या प्रशिक्षणात प्रवेश घेतला. अनेक प्रथित यश डॉक्टर्स किंवा त्यांची कुटुंबातील सदस्य तिथे शिकत असल्याने अनुपमा जोशी यांचाही हुरूप वाढला. त्यात त्यांना रुची निर्माण  झाली. अभ्यासक्रम चांगला वाटल्याने त्यांनी पूर्ण पदविका अभ्यास करण्याचा निर्णय घेतला.


सर्व प्रथम त्यांनी गरोदर बायकांच्या पोषणाबाबत अभ्यास करतांना दैनंदिन आहारातून त्यांना आवश्यक असलेल्या पोषणमूल्याच्या गरजा कश्या भागवत येतील याचा अभ्यास केला. त्यांना कुठल्याही प्रकारचे पूरक जोड आहार (सप्लिमेंटरी फूड) न देता  दैनंदिन आहारावरच कसे सुदृढ ठेवता येईल अश्याप्रकारे मूल्यांकन करून आहाराची यादी केली.

आजच्या बदलत्या जीवन शैलीत जंक फूड , फास्ट फूड लहान मुलांना आवडू लागली आहेत. मात्र दुष्परिणाम मुलांच्या प्रकृतीवर होतात. मुलांना पाश्चिमात्य याहार पद्धती पासून  दूर नेऊन पारंपरिक आहाराचे महत्व पटवून देणे महत्वाचे असल्याने त्यांनी काही पदार्थांचे स्वरूप (लुक ) बदलण्याचाही प्रयत्न केला.त्याबाबद्दल त्या सांगतात नाचणी सत्व , गव्हाचा कोंडा,मसूर डाळ, कुळीथ,जवस, यांचे पोषण मूल्य भरपूर असल्याने त्यांचा आहारात समावेश होणं गरजेचं आहे. पिझ्झावर जवस भुरभुरल्यावर (स्प्रिंकल) जवसाचे महत्व वाढले.आपणही असा वापर का करू नये. मग इंडियन इंग्रिडियन्ट विथ वेस्टर्न लुक ची संकल्पना राबवून मुलांना आवडतील अश्या छान रंगीन पाश्चिमात्य दिखाव्याचे आहार तयार केले. दलिया मध्ये रंगीत भाज्या वापरून , मुगाला मोड आणून मुलांना आवडतील अश्या चवीचं स्वरूपात तर कोंड्याचे बुलेट, मंच्युरियन केले , मुलांना ते आवडू लागले हळू हळू मुलं पाश्चिमात्य पदार्थांपासून दुरावू लागले. पुण्यातील डॉट टू डॉट या संस्थेतील मुलांसाठी त्यांची उंची , वजन , स्टॅमिना , बौद्धिक पातळी आदींचा विचार करून योजनाबद्ध आहार ठरवून दिला आहे. लहान वयातच मुलांना पूरक जोड (सप्लिमेंट) अन्न सुरु केले जाते या ऐवजी भारतीय आहार दिल्याने मुलांना सप्लिमेंट मधून मिळणाऱ्या पोषण मुल्यापेक्षा जास्त पोषणमूल्ये असलेला आहार मिळतो. उदा.वरण-भात तूप लिंबू यातूनही कार्बोहायड्रेट , व्हिटॅमिन C ,प्रथिनं , फॅट्स यांची गरज भागवू शकतात तर इडली-सांबार- चटणी  हे पदार्थ शरीराला कर्बोदकं , प्रथिन ,  तंतू,आणि मुळात म्हणजे इडलीचे पीठ आंबविल्याने त्यात निर्माण होनारे शरीराला उपयुक्त बॅक्टेरिया यामुळे इडली पचायला हलकी होते आणि आहारमूल्ये कायम राहतात.प्रो बायोटिक इफेक्ट मिळण्यासाठी घरी केलेलं लोणचं हा उत्तम पर्याय ठरू शकतो मात्र त्याचेही सेवन प्रमाणात केले पाहिजे. बाजारात मिळणाऱ्या लोणच्यातील तेल मिठापासून आणि प्रिझर्व्हेटिव्ह मुळे अधिक लोणचं सुद्धा शरीराला घातक असते. 

सप्लिमेंट देण्यात पालकांची स्पर्धा वाढतांना दिसते. तसेच हॉटेल मध्ये गेल्यावर वेगवेगळे पदार्थ चाखण्याच्या नादात आपण आपले आरोग्य गमावून बसतो.हल्ली स्वीगी , झोमॅटो मुळे रात्री अपरात्री जेवण मिळू लागले मात्र त्याच्यामुळे  पचनाचे विकार वाढू लागले , उशिरा उठण्यामुळे दैनंदिन चक्र बिघडू लागलं आणि  एकूणच परिणाम आरोग्यावर होऊ लागला यावर महिलांनी सुट्टीच्या दिवशी तयारी करायला हवी मूग सत्व,मल्टीग्रेन ग्रेव्ही , प्रोटीन ढोकळा , नाचणी सत्व, कुळीथाचे मिश्चर यांचा एकएक पॅक घरी ठेवला तरी त्यातून रुचकर पदार्थ झटपट बनावट येतात. मेसमध्ये जेवणाऱ्यांना फीस्टच्या दिवशी उत्तम पोषण मूल्य असलेले दोसा उत्तपा , अप्पे असे पदार्थ भारतीय व पाश्चिमात्य पद्धतीने घरीच करता येतात. सध्याच्या जाहिरातींच्या युगात आपण टीव्ही वर अनेक प्रकारच्या जाहिराती दिसतात. त्यात डाएट फूडच्या जाहिराती दिसतात तशात जंक फूडच्याही जाहिराती दिसतात. जंक फूड ताबडतोब लक्षात येत मात्र डाएट फूड मध्येही पदार्थांमध्येही घातलेले प्रिझर्व्हेटिव्ह , मीठ , तेल हे असल्याने ते डाएट फूड घेताना त्याचा विचार करायला हवा. असेही अनुपमा जोशी यांनी सांगितलं.

सध्या गरोदर स्त्रिया,खेळाडू,लहान मुले यांना सप्लिमेण्ट्री फूड दिल जातं  कित्येक वेळा त्यासाठी जेवणासाठी पूरक आहार म्हणून त्याचा उपयोग होतो. मात्र असे केल्याने शरीरावर त्याचे दुष्परिणाम दिसून येतात त्यामुळे आपल्या रोजच्या जेवणातच योग्य प्रमाणात प्रथिन , सत्व , कर्बोदकं आणि तंतुमय पदार्थ यांचा योग्य त्या प्रमाणात समावेश केल्यास सप्लिमेण्ट्री फूडच्या दुष्परिणामांना आळा घालता येऊ शकतो. 

याव्यतिरिक्त रक्तदाब , मधुमेह , हाडा संबंधी विकार यावर त्यांची कुठली औषधं  चाकू आहेत त्याला अनुसरून त्या व्यक्तिचा आहार ठरविला जातो. रक्तदाबाच्या रुग्णाला सोडियम खूप वाढले असेल तर तळलेले पदार्थ बंद , सलाड, नाचणीची भाकरी असा समावेश असलेला आहार तर रक्त पातळ होण्यासाठी गोळी सुरु नसेल तर जवस , सूर्यफूल बी, मेथीचे दाणे, भोपळ्याच्या बिया यांनी युक्त आहार दिला जातो . हाडा संबंधीच्या विकारात कॅल्शियम पुरवणे आवश्यक असते त्यानुसार नाचणी सत्व , शेवगाच्या पाल्याची भाजी असा वजन न वाढविणारा आहार तसेच व्हिटॅमिन E आणि C  यांनी युक्त आहार परिस्थिती नुसार नाचणीच्या पेजेपासून नाचणीच्या भाकरी पर्यंत दिला जातो.  

पतीच्या आजारपणाचा बोध घेऊन स्वतःच आहार  तज्ञ बनलेल्या अनुपमा जोशी या वर्तमानपत्रात आणि वेब पोर्टलवर सदरं, वेबिनार द्वारे व्याख्याने , मार्गदर्शन, रुग्णाचा व्यक्तिगत परिस्थिती नुसार डाएट प्लॅन करणे आणि  मुरली फाऊंडेशन द्वारे फेसबुक च्या माध्यमातून लाईव मार्गदर्शन करतात. स्वतः पुरते ज्ञान मर्यादित न ठेवता समाजाचं स्वास्थ्य कसे सुधारेल या कडे लक्ष देतात त्यांच्या या कार्याचे "नगर टुडे" परिवाराच्या वतीने शुभेच्या.   

Post a Comment

0 Comments