शिवसैनिकां प्रमाणे माझी हत्या होण्याची वाट पाहू का :काळे यांचा संतप्त सवाल?

 शिवसैनिकां प्रमाणे माझी हत्या होण्याची 

वाट पाहू का :काळे यांचा संतप्त सवाल?

वेब टीम नगर: किरण काळे यांनी घडल्या प्रकाराबाबत बोलताना म्हटले आहे की केडगाव हत्याकांडातील आरोपी संग्राम अरुण जगताप याचे कार्यकर्ते असणारे घटनेतील इतर आरोपींनी केडगाव मधील दोन शिवसैनिकांची दिवसाढवळ्या गळा चिरून निर्घुणपणे हत्या केली. यामध्ये स्वतः संग्राम जगताप हा आरोपी म्हणून पोलीस दप्तरी नोंद आहे. अंकुश मोहिते सारखा सराईत गुन्हेगार जर त्या ठिकाणी माझ्या वरती चाल करून आल्यानंतर केडगाव मधील हत्याकांड प्रमाणे माजी हत्या होण्याची मी वाट पाहिली पाहिजे का ? त्यामुळे मी प्रतिकार केला आणि करत राहणार. स्वतःचा संरक्षण करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे असे काळे यांचे म्हणणे आहे. 

प्रसारमाध्यमांना काळे यांचे विनम्र आवाहन

प्रसार माध्यमांमध्ये काम करणारी पत्रकार, संपादक मंडळी देखील सामान्य घरातील आहेत. त्यांना किरण काळे यांनी जाहीर आवाहन केले आहे की माझी भूमिका आपण वर्तमानपत्रांच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवावी. हा लढा  व्यक्तीविरुद्ध नसून प्रवृत्ती विरुद्ध आहे आणि नगरचा खऱ्या अर्थाने श्वास मोकळा करण्यासाठीचा आहे. यामध्ये माध्यमांनी माझा आवाज जनतेपर्यंत पोहोचवा असे जाहीर विनम्र आवाहन काळे यांनी प्रसारमाध्यमांना केले आहे. 

नगर शहराचा विकास करणे हे माझे स्वप्न 

नगर शहर गेल्या अनेक दशकांपासून विकासापासून वंचित आहे. गुन्हेगारीची लागलेली कीड यामुळे तो कुठला आहे. या शहराचा खऱ्या अर्थाने विकास करणं यासाठी काँग्रेस पक्ष शहरात निर्भयपणे काम करता राहणार आहे, असे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी म्हटले आहे . Post a Comment

0 Comments