।। जागर शक्तीचा ।। जागर नवदुर्गांचा ।।

 ।। जागर शक्तीचा ।। जागर नवदुर्गांचा।।

कुष्मांडा 


देवी सिद्धीदात्रीच्या अवतारानंतर पार्वतीने सूर्याच्या केंद्रस्थानी निवास केला जेणेकरून सूर्य अखिल जगातला ऊर्जा पुरवू लागला म्हणून या देवीला कुष्मांडा  लागले. 

देवी कुष्मांडा ही शक्ती आणि क्षमतेची देवता आहे जी सूर्यात सामावलेली आहे. या देवीची कांती व तेज सूर्य प्रमाणेच प्रखर आहे. 

पूजन : कुष्मांडा देवीचे पूजन नवरात्रीच्या चवथ्या दिवशी करतात. 

अधीपत्यातील ग्रह: कुष्मांडा हि सूर्याला दिशा आणि ऊर्जा पुरवत असल्याने सूर्यावर तिचे अधिपत्य असते. 

देवीचे वर्णन :

सिंहावर आरूढ असलेली कुष्मांडा देवी हि अष्टभुजा आहे. कमंडलू ,धनुष्य ,बाण आणि कमळ हि आयुधे उजव्या बाजूच्या हातांमध्ये तर अमृत कलश , जपमाळ , गदा आणि चक्र आदी डाव्या बाजूच्या हातांमध्ये असतात. 

आठ हात असल्याने तिला अष्टभुजा देवीही म्हणले जाते. असे म्हणतात कि सिद्धी आणि निधी बहाल करण्याची क्षमता तिच्या जपमाळेत असते .असे मानतात कि ह्या ब्रह्मांडाची निर्मिती देवी कुष्मांडाच्या स्मित हास्यांतून झालीतसेच कोहोळ्याचा बळी प्रिय त्याला कुष्मांड असे देखील म्हणतात . बर्हाणडं आणि कुष्मांड यांच्या नाम साधर्म्या मुळे देवीचे नावही कुष्मांडा प्रसिद्ध झाले. 

देवी कुष्मांडाला लाल रंगाची फुलं प्रिय आहेत. 

मंत्र : ॐ देवी कूष्माण्डायै नमः॥

प्रार्थना

सुरासम्पूर्ण कलशं रुधिराप्लुतमेव च।

दधाना हस्तपद्माभ्यां कूष्माण्डा शुभदास्तु मे॥

स्तुती:या देवी सर्वभूतेषु माँ कूष्माण्डा रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

देवी ध्यानाम :

 वन्दे वाञ्छित कामार्थे चन्द्रार्धकृतशेखराम्।

सिंहरूढ़ा अष्टभुजा कूष्माण्डा यशस्विनीम्॥

भास्वर भानु निभाम् अनाहत स्थिताम् चतुर्थ दुर्गा त्रिनेत्राम्।

कमण्डलु, चाप, बाण, पद्म, सुधाकलश, चक्र, गदा, जपवटीधराम्॥

पटाम्बर परिधानां कमनीयां मृदुहास्या नानालङ्कार भूषिताम्।

मञ्जीर, हार, केयूर, किङ्किणि, रत्नकुण्डल, मण्डिताम्॥

प्रफुल्ल वदनांचारू चिबुकां कान्त कपोलाम् तुगम् कुचाम्।

कोमलाङ्गी स्मेरमुखी श्रीकंटि निम्ननाभि नितम्बनीम्॥

स्तोत्र:

 दुर्गतिनाशिनी त्वंहि दरिद्रादि विनाशनीम्।

जयंदा धनदा कूष्माण्डे प्रणमाम्यहम्॥

जगतमाता जगतकत्री जगदाधार रूपणीम्।

चराचरेश्वरी कूष्माण्डे प्रणमाम्यहम्॥

त्रैलोक्यसुन्दरी त्वंहि दुःख शोक निवारिणीम्।

परमानन्दमयी, कूष्माण्डे प्रणमाम्यहम्॥

देवी कवच

हंसरै में शिर पातु कूष्माण्डे भवनाशिनीम्।

हसलकरीं नेत्रेच, हसरौश्च ललाटकम्॥

कौमारी पातु सर्वगात्रे, वाराही उत्तरे तथा,

पूर्वे पातु वैष्णवी इन्द्राणी दक्षिणे मम।

दिग्विदिक्षु सर्वत्रेव कूं बीजम् सर्वदावतु॥


Post a Comment

0 Comments