मनपाचे ७१६ कोटीचे अंदाज पत्रक सादर

 मनपाचे ७१६ कोटीचे अंदाज पत्रक सादर 

शिल्लकी अंदाज पत्रकात गेल्यावर्षी पेक्षा ४२ कोटींची घट 


वेब  टीम नगर - कोरोना प्रादुर्भावामुळे रखडलेले आणि नगरसेवकांची अंदाजपत्रक सादर करण्याची होत असलेली मागणी लक्षात घेऊन मनपा  प्रशासनाने सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाचे ७१६ कोटी ७१ लाखांचे अंदाजपत्रक आज महासभेत सादर केले मागील वर्षी प्रशासनाकडून ७५७ कोटींचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले होते .गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या अंदाजपत्रकात सरासरी ४२ कोटींची घट आहे.  तर साडेतीन कोटी रुपये शिल्लक आहे.अंदाजपत्रकावर अभ्यासासाठीही महासभा स्थगित करण्यात आली असून उद्या दुपारी १ वाजता पुन्हा महासभा सुरू होणार आहे. त्यात अंदाजपत्रकावर चर्चा होणार आहे.  दरम्यान या सभेस स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर गैरहजर होते.सभापती झाल्यानंतर त्यांची पहिलीच सभा होती. 

महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली आज ऑनलाईन पद्धतीने अंदाजपत्रकीय महासभा झाली.यावेळी आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी ७१५ कोटी ७१ लाखांचे अंदाजपत्रक महापौर वाकळे यांच्याकडे सादर केले यावेळी उपमहापौर मालनताई ढोणे , उपायुक्त प्रदीप पठारे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण मानकर,नगरसचिव एस.बी तडवी आदी उपस्थित होते.दरम्यान अंदाजपत्रकातील नगरसेवक निधी व इतर कामे रखडल्याचा आरोप नगरसेवक कडून करण्यात आला होता महासभेत अंदाजपत्रक सादर करावे अशी मागणी नगर सेवकांकडून सातत्याने होत होती.त्यानुसार आज सकाळी ११ वाजता अंदाजपत्रकीय सभेस सुरुवात झाली.

या अंदाजपत्रकात महसुली उत्पन्न २९४ कोटी ७३ लाख भांडवली जमा ३८० कोटी १ लाख महसुली उत्पन्नात संकलित करा पोटी ३४ कोटी,  शास्ती पोटी ५५ कोटी संकलित करा वर आधारित करापोटी १४ कोटी जीएसटी अनुदान ९५ कोटी ७४ लाख व इतर महसुली अनुदान ३ कोटी,पाणीपट्टी १८ कोटी मीटरद्वारे पाणीपुरवठा ४२ कोटी ९८ लाख गाळाभाडे ३ कोटी संकीर्ण ९८ लाख रुपये आदी महत्त्वाच्या बाबी आहेत.महसुली खर्च २४१ कोटी ७६ लाख भांडवली कामांवर अनुदान कर्ज व मनपा हिस्सा धरून ४३० कोटी २७ लाख जमा होणार आहेत.खर्चामध्ये वेतन,भत्ते व मानधनावर १२१ कोटी रुपये तर पेन्शन पोटी ३१ कोटी, पाणीपुरवठा वीज बिल ३४ कोटी,पथदिवे विज बिल ९ कोटी ५० लाख, शिक्षण मंडळ वर्गणी ३ कोटी ६५ लाख, महिला व बालकल्याण योजना १ कोटी ३६ लाख, अपंग पुनर्वसन योजना १ कोटी ३६ लाख,मागासवर्गीय कल्याणकारी योजना ४ कोटी ७ लाख, नगरसेवक मानधन १ कोटी ८० लाख, औषधे व उपकरणे ६० लाख नगरसेवक स्वेच्छा निधी ५ कोटी ९६ लाख, कचरा संकलन व वाहतूक १ कोटी, पाणीपुरवठा साहित्य खरेदी व दुरुस्ती ७० लाख, टँकरद्वारे पाणीपुरवठा व ब्लिचिंग पावडर खरेदी १ कोटी ६५ लाख,अशुद्ध पाणी आकार १ कोटी ७५ लाख यासह शासनाकडून प्राप्त विविध कामांसाठी निधीची ,  मनपा हिश्श्याची  रक्कम भरणे प्रस्तावित आहे. शासन अनुदानातून अमृत योजना,सर्वांसाठी घरे,नगरोत्थान योजना, मूलभूत सोयी सुविधा,आदी योजना राबविण्याचे अंदाज पत्रकात नमूद केले आहे.गेल्या वर्षी तत्कालीन आयुक्त श्रीकांत भालसिंग यांनी ७५७ कोटींचे अंदाजपत्रक समितीला सादर केले होते.स्थायी समितीने १४ कोटी ४१ लाखांच्या ७६९ कोटींचे अंदाजपत्रक पाठविले होते.श्रीकांत मायकलवार २०२०-२१ या आर्थिक वर्षाचे ७१५ कोटी रुपये ७१ लाखाचे अंदाजपत्रक सादर केले आहे. 

कोतकर उशिरा पोहोचले 

सभापती मनोज कोतकर हे अंदाजपत्रकीय सभा संपल्यानंतर उशिरा मनपात पोहोचले . पदाधिकारी व अधिकारी महापौरांच्या  दालनात बसून चर्चा करत असताना सभेची कल्पना का दिली नाही अशी विचारणा कोतकर यांनी केली. मात्र कोतकर यांच्या स्वीय सहाय्यकाला दोन वेळा फोन करून कल्पना दिल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 


Post a Comment

0 Comments