सभापती कोतकर यांच्या अडचणीत वाढ

सभापती कोतकर यांच्या अडचणीत वाढ

 भाजप कार्यकारिणीत कारवाईचा ठराव

वेब टीम नगर - स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर यांच्या विरुद्ध कारवाई करण्यासंदर्भातील निर्णय भाजपच्या शहर जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला. पक्षाच्या मनपातील गटनेते यांमार्फत विभागीय आयुक्तांकडे तक्रार करण्याचा ठराव यावेळी करण्यात आला आहे त्यामुळे कोतकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

सभापती कोतकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून स्थायी समितीचे सभापतीपद पटकाविले आहे ते भाजपकडून नगरसेवक व भाजपच्या कोट्यातून स्थायी समिती सदस्य झालेले आहेत.ते भाजपचे आहेत की राष्ट्रवादीचे याबाबत स्पष्ट करण्यासाठी भाजपने तीन दिवसात खुलासा करण्याची नोटीस बजावली होती,मात्र कोतकर यांच्याकडून खुलासा करण्यात आला नाही. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी त्यांना नोटीस पाठवून खुलासा करण्याचे स्पष्ट केले होते.  भाजपकडून आपण नगरसेवक म्हणून निवडून आलाअसल्याने पक्ष हिताविरुद्ध कोणताही निर्णय घेण्याचा कायदेशीर अधिकार आपल्याला नाही, त्यामुळे आपण भाजपचा राजीनामा दिला काय व राष्ट्रवादीचे उमेदवार होता काय याचा खुलासा करण्याचे नोटिशीत म्हटले आहे.कोतकर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. त्यासाठी गटनेत्या मार्फत विभागीय आयुक्तांकडे तक्रार करण्याचा ठराव सादर करण्यात आल्याचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी सांगितले वर्तमानपत्रातून आलेले फोटो बातम्यांच्या आधारावर आता त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.गटनेते  यांना याबाबत अधिकार असल्यामुळे त्यांना कारवाई करण्यासाठी आदेश देण्यात येणार आहेत. याबाबत बैठकीत ठराव करण्यात आला असे गंधे यांनी सांगितले. Post a Comment

0 Comments