आ. संग्राम जगताप यांच्या दहशतीमुळे काँग्रेस कदापि झुकणार नाही

 आ. संग्राम जगताप यांच्या दहशतीमुळे 

काँग्रेस कदापि झुकणार नाही 


 किरण काळे : छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकर यांच्या विचारांना मानणारा मी कार्यकर्ता

वेब टीम नगर - मागील आठवड्यामध्ये नगर शहरातील व्यापारी सुनील भळगट आणि त्याच्या कुटुंबीयांवर घरात घुसून हल्ला करण्याचे काम केलेल्या राष्ट्रवादीचे गुंड आमदार संग्राम जगताप यांचा कार्यकर्ता तसेच पोलीस अधीक्षक हल्ल्यातील आरोपी अंकुश मोहिते यांनी आज जाणीवपूर्वक माझ्यावरती नियोजनबद्धरित्या बनाव निर्माण करत महसूल मंत्री तथा प्रांताध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली काँग्रेसची घोडदौड रोखण्यासाठी अट्रोसिटी चा गुन्हा दाखल करायची धमकी देत काँग्रेस कमिटी च्या समोर रचलेला डाव काँग्रेस कार्यकर्त्यांनी उधळून लावला. 

घडलेल्या घटनेबाबत काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये अंकुश मोहिते व दोन अज्ञात गुंडा विरुद्ध रात्री फिर्याद दिली यावेळी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते . आ. संग्राम जगताप यांच्या यांचा गुंड कार्यकर्त्यांना पुढे करत काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष अट्रॉसिटी चा खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी आटापिटा करताहेत वास्तविक पाहता लोकप्रतिनिधींनी समाजामध्ये अशा जातीय तेढ निर्माण होऊ नये यासाठी काम करायचे असते परंतु गेली अनेक वर्ष खोट्या केसेस करणे हेच काम संग्राम जगताप यांनी केले त्यांच्याकडून ह्यापेक्षा वेगळ्या अपेक्षा बाळगण्याचे कारण नाही असेही किरण काळे यांनी म्हटले आहे.  

  माझ्या  अगोदर भळगट  प्रकरणांमध्ये भळगट कुटुंबियातील पुरुष सदस्य व महिला भगिनींनी वर झालेला अन्याय कारक प्रसंगात मदतीला धावून जाणारे या शहरातील वंदनीय असणारे स्वर्गीय सुवालाल गुंदेचा यांचे चिरंजीव आणि काँग्रेस पक्षाचे नगर शहरातील नेते मनोज गुंदेचा यांच्यावर देखील खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता.  एवढ्यावर त्यांचे समाधान झाले नाही की काय म्हणून दुसरा अध्याय घडवत माझ्यावरती हा प्रयोग करण्यात आला अंकुश मोहिते आणि त्यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या सांगण्यावरूनच काँग्रेस कमिटीच्या कार्यालयावरती पाळत ठेवत माझा मार्ग काढत त्याठिकाणी जाणीवपूर्वक पार्किंगचे  पैसे मागण्या वरून वाद निर्माण केला वास्तविक पाहता पार्किंगचे पैसे देऊन मी रीतसर पावती देखील त्यांच्याकडून घेतली होती असे असताना सुद्धा त्या ठिकाणी बनाव उभा केला गेला मला चहूबाजूंनी घेरण्याचा प्रयत्न केला गेला वास्तविक पाहता मी संबंधित इसमाकडे ओळखपत्राची मागणी केली त्यावेळी ते दाखवण्याऐवजी त्यांनी मला शिवीगाळ सुरू केला तू आमच्या संग्राम भैयांना नडतो तुझ्याकडे बघतो तुझा कार्यक्रम करून टाकतो असे म्हणत मला धमकावलं खोटा गुन्हा तुझ्यावर टाकू असे म्हणत मला घाबरवण्याचा प्रयत्न केला. 

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांच्या बरोबरच घटनेचे शिल्पकार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती माझी नितांत श्रद्धा आहे. मी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून  जिल्ह्यात जातो त्या ठिकाणी बाबासाहेबांचा आणि त्यांनी दिलेल्या घटनेचा संविधानाचा आवर्जून उल्लेख करत असतो त्यामुळे दलित बांधवांमध्ये चुकीची माहिती पसरवत त्याला जातीय रंग देण्याचे पाप संग्राम जगताप यांनी करू नये खोट्या आरोपांना मी कधीही भीक घालत नाही असेही किरण काळे यांनी म्हटले आहे. 

नगर शहरातील अन्यायाविरुद्ध निर्भीडपणे 35 वर्षे आवाज उठवणारे अनिल भैया राठोड यांचा दुर्दैवाने निधन झालं त्यांच्या शोकसभेला देखील ही गुंड प्रवृत्तीची माणसे आले नाहीत त्यांच्या अंत्यविधीला आली नाही त्यांचा दशक्रिया विधीलाही आले नाहीत ते जिवंत असताना कायम त्यांचा मत्सर  जगताप  कुटुंबियांनी केला मात्र मृत्युनंतर देखील त्यांनी अनिल भैय्या यांच्याशी असणारे वैर आजही कायम  ठेवले आहे. हे त्यांच्या वागणुकीतून दाखवून दिले अनिल भैया राठोड यांचा शहरांमध्ये अपप्रवृत्तींचा विरोधात होता तोच वचक काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ठेवण्याचे काम किरण काळे आणि काँग्रेस निर्भीडपणे करणार आहे हे या टोळीने विसरू नये असा सज्जड इशाराही शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिला आहे. 

बाळासाहेब थोरातांबद्दल बोलण्याची जगतापांची उंची  नाही. 

या सर्व प्रकरणात आ. संग्राम जगताप यांनी सत्यजित तांबेंचा पराभव जिव्हारी लागल्याने सत्यजित तांबे आणि बाळासाहेब थोरात हे माझ्यावर आरोप करतात असा आरोप संग्राम जगतापांनी केला. त्यावर बाळासाहेब थोरात हे गेली ४० वर्षे राजकारणात असून अत्यंत संयमी व्याकरिमत्व म्हणून त्यांच्याकडे उभा महाराष्ट्र पाहतो , त्यांच्या बद्दल बोलण्याची जगताप यांची उंची नाही असे किरण काळे म्हणाले  

Post a Comment

0 Comments