राज्यशासनाचा आदेश धुडकावून घटस्थापना

राज्यशासनाचा  आदेश धुडकावून घटस्थापना


मंदिरे भाजप आक्रमक : गौरीघुमट येथील तुळजाभवानी मंदिरात ११ दाम्पत्यांच्या हस्ते घटस्थापना 

गुन्हे नोंदवले तरी बेहत्तर मात्र मंदिर बंद करणार  नाही : वसंत लोढा 

वेब टीम नगर-राज्यात मंदिरे उघडण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे.ठाकरे सरकारचे विरोधात दोनच दिवसापूर्वी धरणे  आंदोलन करण्यात आले होते जिल्ह्यात भाजप पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारच्या आदेशाचा आधार घेत मंदिर उघडून घटस्थापना केली नगर शहरातील गौरीशंकर मित्र मंडळाने सरकारच्या मंदिरे न उघडण्याचे निर्णयाचा निषेध करत तुळजाभवानी मातेचे मंदिर मातेचे मंदिर उघडून विधीवत घटस्थापना केली तुळजाभवानी मातेने राज्यातील मंदिरे लवकरात लवकर उघडण्याची सद्बुद्धी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देवो असे म्हणत गुन्हे दाखल केले तरी चालतील पण मंदिर बंद करणार नाही असा इशारा मंडळाचे अध्यक्ष भाजप नेते वसंत लोढा यांनी दिला आहे. 


वसंत लोढा म्हणाले की राज्यातील आघाडी सरकारने भाविकांच्या भावनांचा विचार न करता नवरात्रीत ही मंदिरे बंद ठेवली आहेत मंदिरे न उघडण्याचा निर्णय  गौरीशंकर मित्र मंडळ ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही निषेध करत आहोत केंद्रातील भारतीय जनता पार्टीच्या सरकारने देशातील मंदिर उघडण्याचे आदेश केव्हाच दिला आहे मात्र केंद्र सरकारचा एक व राज्य सरकार वेगळाच आदेश आहे नागरिकांनी नक्की आदेश पाळायचा कोणता आम्ही आता केंद्र सरकारने मंदिर उघडण्याच्या दिलेल्या आदेशाचे पालन करत घोषणा केल्याप्रमाणे गौरीघुमट येथील तुळजाभवानी मातेचे मंदिर उघडून विधीवत घटस्थापना केली आहे या नंतरही जर राज्य सरकारने मंदिरे उघडले नाहीत तर भाविकांच्या सहनशक्तीचा अंत होईल मोठा उद्रेक राज्यात होईल असे ते म्हणाले शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त गौरीशंकर मित्रमंडळाने तुळजाभवानी मातेच्या मंदिरात शनिवारी सकाळी विधिवत अभिषेक करून मंडळाचे संस्थापक वसंत लोढा व माजी नगराध्यक्ष यांच्या हस्ते घटस्थापना केली विविध क्षेत्रातील ११ दाम्पत्यांच्या हस्ते देवीची महाआरती करण्यात आली. 


भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक महेंद्र गंधे यांनी यावेळी आवर्जून हजेरी लावली ते म्हणाले की भारतीय जनता पार्टीने गेल्या चार महिन्यांपासून सातत्याने राज्य सरकारकडे मंदिर उघडण्याची विनंती करत आंदोलने केली मात्र गणेशोत्सव गेला आता नवरात्र उत्सव सुरू झाला तरीही मंदिरे बंदच आहेत त्याचा निषेध करत वसंत लोढा यांनी गौरीघुमट येथील तुळजाभवानी मातेचे मंदिर उघडून घटस्थापना केली हिंदू भाविक आता शांत बसण्याचा मनस्थितीत नाहीत त्यामुळे सरकारने ताबडतोब मंदिरे उघडण्याचा निर्णय घ्यावा घटस्थापना सोहळ्याला एल.जी गायकवाड, सदाभाऊ शिंदे, हरिभाऊ डोळसे ,बापू ठाणगे, आरती आढाव,बाळासाहेब भुजबळ, सागर शिंदे, संतोष शिंदे, संजय शिंदे, संदीप शिंदे आदींसह नागरिक मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

Post a Comment

0 Comments