नवरात्रीनिमित नव महानायिकांचा एकपात्री प्रयोग

 

नवरात्रीनिमित नव महानायिकांचा एकपात्री प्रयोग 

संपुर्णा  सावंत : जिजाऊ ब्रिगेडचा  नवरात्री निमित्ताने आगळा वेगळा उपक्रम

     वेब टीम नगर- मराठा सेवा संघ प्रणित महाराष्ट्र प्रदेश ’जिजाऊ ब्रिगेड’ तर्फे नवरात्रौत्सवनिमित्त नऊ दिवस ’जागर लोककलेचा-वसा स्त्रीशक्तीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज बहुजन महानायिकांचे एकपात्री प्रयोग, तसेच महाराष्ट्रभरातील विविध संस्कृतिक लोकगीते जिजाऊ ब्रिगेडच्या महिला सादर करणार आहेत. त्यासह अनिष्ठ रूढी- परंपरा, अंधश्रद्धा निर्मूलनपर आणि स्त्रीशक्तीचे दर्शन या विषयावर व्याख्यानमालेसह भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

     शनिवार, 17 ऑक्टोंबर रोजी म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी दुपारी 2 वाजता ऑनलाईन होणा-या या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवधर्म संसद सदस्य तथा माजी आ. रेखाताई खेडेकर यांच्या हस्ते होणार आहे. नंतर जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्याक्षा माधुरी भदाणे प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करतील या नंतर विविध बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमासह अतिशय दुर्मिळ अशा विषयावर व्याख्याने होणार आहेत. त्यामध्ये शिवप्रदीपाचार्य डॉ. दिलीप धानके (ठाणे) यांचे जिजाऊ पारायण, पहिल्या अहिराणी डॉक्टरेट व साहित्य डॉ. प्रा. उषा सावंत (नाशिक) यांच्या ’जात्यावरच्या ओव्या’ , लग्न व हळदीगीत आणि ज्येष्ठ विचारवंत, लेखक व मुक्त पत्रकार डॉ. सुभाष देसाई (कोल्हापूर) यांच्या अंबाबाई महात्म्य, सत्य व मिथके यावरील व्याख्यानाचा समावेश आहे. ड. शंकरराव निकम (मुंबई ) यांचे ’स्त्री पुरुष समानता व स्त्रियांचे धार्मिक अधिकार’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. कवयित्री व लेखिका प्राचार्य डॉ. अनुराधा बर्‍हाडे यांच्याशी लाईव्ह हितगुज देखील होणार आहे.

  प्रख्यात निवेदिका व जिजाऊ ब्रिगेडच्या राज्य प्रसिद्धीप्रमुख श्री प्रा मानकर (अमरावती) यांचे ’समाज घडणीसाठी समाज परिवर्तन’ यावर व्याख्यान होईल. डॉ.विजय चोरमारे (कोल्हापूर) यांचे ’ वर्तमानातील स्त्रीशक्ती ओळख’ या विषयावर व्याख्यान होईल. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. साहेब खंदारे (परभणी) हे ’देवी बाबत मिथकांचा संबंध’ यावर समारोपीय व्याख्यान करतील. या संपूर्ण कार्यक्रमाची तांत्रिक व्यवस्था क्षिप्रा मानकर सांभाळणार आहेत

     हे सर्व कार्यक्रम 17 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर 2020 रोजी या काळात दररोज दुपारी 2 ते 4 वाजता महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडच्या अधिकृत फेसबुक पेज वर पाहायला मिळतील. या मध्ये दि.19 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने लोकगीत सादर करण्यात येणार असुन सर्व फेसबुक युझर्सनी या पेज वर कार्यक्रम पहावा, असे अवाहन जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा उत्तर विभाग संपुर्णा सावंत, दक्षिण जिल्हाध्यक्ष अनिता काळे, शहरध्यक्ष सुरेखाताई कडुस, शिवधर्म संसद सदस्य मंदाताई निमसे, प्रदेश सचिव राजश्रीताई शितोळे, श्रध्दा वाणी, वृषाली कडलग, सुवर्णा खताळ, संगमनेर जिजाऊ ब्रिगेडच्या माधुरी शेवाळे, डॉ.वृषाली साबळे, उज्वला देशमुख, अकोले जिजाऊ ब्रिगेडच्या डॉ.निलम शिंदे, श्रीरामपुर जिजाऊ ब्रिगेडच्या जयाताई जगताप, राहुरी जिजाऊ ब्रिगेडच्या संगिताताई खर्डे,निर्मला गुंजाळ, सुनंदा दिघे नेवासा जिजाऊ ब्रिगेडच्या संपदा ससे,शितल काळे,श्रध्दा तांबे, नंदा मुळे, शिला थोरात, मंदा औटी,शर्मिला कदम,माया जगताप यांच्यासह तसेच समस्त मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेडने केले आहे.

Post a Comment

0 Comments