बनावट ओळखपत्र दाखवून लष्कराच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न

 बनावट ओळखपत्र दाखवून

 लष्कराच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न 


भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

वेब टीम नगर- लष्कराच्या हद्दीत बनावट ओळखपत्र दाखवून घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन तरुणांना भिंगार कॅम्प पोलिसांनी अटक केली आहे. तुषार ज्ञानेश्वर पाटील आणि सोपान महारु पाटील (रा.कापूरणी ता.जि धुळे)अशी पकडण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. त्यांना आज न्यायालया समोर हजार केले असता  त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, अहमदनगरच्या लष्कराच्या हद्दीमध्ये बीटीआर परिसरातून लष्कराचे बनावट ओळखपत्र दाखवून तुषार पाटील व सोपान पाटील ही दोघे तरुण गुरुवारी दुपारच्या वेळेत दुचाकीवर जात होते. या दरम्यान त्यांना प्रवेशद्वारावर असणा-या जवानांनी थांबवून दोघांकडे चौकशी केली असता त्या दोघांनी लष्कराचे एक ओळखपत्र दाखवले. परंतु त्यांनी ओळखपत्राबाबत अधिक माहिती घेतली असता, दोघांनी दाखविण्यात आलेले ओळखपत्र बनावट असल्याचे उघड झाले. यानंतर त्या दोघां तरुणांना भिंगार कॅम्प पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. यानंतर गुरुवारी (दि.१६) रात्री उशीरा भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये तुषार पाटील व सोपान पाटील या तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या दोघां तरुणांना न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.




Post a Comment

0 Comments