आरोग्य आहार

आरोग्य आहार 


गव्हाची दलिया खीर 

साहित्य:

गव्हाचा दलिया १ वाटी , दीड वाटी ओल्या नारळाचा चव, २ वाटी सेंद्रिय गुळ, कच्ची बडीशेप पावडर , वेलची पावडर ,काजू, बदाम, साजूक तूप. 

कृती:

गव्हाचा दलिया प्रथम धुवून घ्यावा. नंतर साजूक तूप टाकून चांगला गुलाबी परतून घ्यावा व कुकर मध्ये २ ते ३ शिट्ट्या करून चांगला शिजवून घ्यावा. 

नंतर शिजलेल्या दलामध्ये गूळ घालून शिजवून घेणे. नंतर त्यामध्ये बडीशेप पावडर, वेलची पावडर घालून, एक उकळी येवू देणे. फक्त उकळी आल्यानंतर नारळाचा चव व वाटीभर दूध घालून शिजवून घेणे.

एका बाउलमधे काढून घेणे बदाम व काजू घालून सर्व्ह करणे.

पोषक मूल्ये:

 गव्हाच्या दलियामध्ये भरपूर फायबर असते. सेंद्रिय गुळामध्ये आयर्न मिळते. तर ओल्या नारळामधे सॅच्युरेटेड फॅट असल्याने नारळाचा चव खूप फायदेशीर आहे. तसेच नारळ , नारळाचे पाणी या मध्ये आयोडीन असल्याकारणाने थायरॉईड मधेही खूप फायदाही होतो. 

  

अनुपमा वैभव जोशी : ९४०४३१८८७५

* Dietitian and Nutritionist 

* B.Sc in Food Science and Nutrition 

* Diploma in Nutrition and Health Education

* Diploma in Yog Shikshak 




Post a Comment

0 Comments