स्व.विखे यांनी ग्रामीण भागाचा चेहरा-मोहरा बदलला

स्व.विखे यांनी ग्रामीण भागाचा चेहरा-मोहरा बदलला 

पंतप्रधान नरेंद्र मोदी : स्व. विखे यांच्या "देह वेचावा कारणी" या आत्मचरित्राचे व्हर्चुअल प्रकाशन 


वेब टीम नगर - माजी केंद्रीय राज्य मंत्री व राज्यातील धुरंधर राजकारणी पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या " देह वेचावा कारणी " या आत्मचरित्राचे व्हर्चुअल  प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.

बाळासाहेब विखे यांनी गाव, आणि शेतकऱ्यांसाठी आपल्ये आयुष्य वेचले विखे पाटील यांनी सहकार चळवळी साठी केलेले प्रयत्न त्यांनी पाहिलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्या सोडवण्यासाठी केलेले प्रयत्न यामुळेच ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलल्याचे मोदी यांनी म्हणले. 

सहकार चळवळ हि खरी धर्मनिरपेक्ष असल्याचे विखे पाटील म्हणायचे. शेतकऱ्यांना समृद्ध करण्यात सहकार चळवळीचा मोठा वाटा आहे. त्यामुळे विखेंच्या आत्मचरित्राला देण्यात आलेलं नाव "देह वेचावा कारणी" हे अत्यंत चपखल असल्याचं सांगताना विखेंच्या आयुष्यच संपूर्ण सार या नावात सामावले असल्याचे मोदी म्हणाले . 

 देशात कुठेही ग्रामीण शिक्षणाची चर्चा नसताना विखे यांनी ग्रामीण शिक्षणासाठी पुढाकार  घेतला. सत्ताही लोककल्याणाचे माध्यम आहे असे ते नेहेमी म्हणायचे. सत्ता आणि राजकारणाचा वापर त्यांनी समाजाच्या कल्याणासाठी केला शैक्षणिक संस्था उभ्या केल्या. तरुणांना रोजगार दिला अश्या शब्दात  मोदींनी विखेंच्या कामाचा गौरव केला. प्रवरानगर येथील डॉ.धनंजय गाडगीळ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला विखे कुटुंबासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील , विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे या कार्यक्रमाला उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments