नगर शहर खड्ड्यात

नगर शहर खड्ड्यात 

खड्डे बुजवण्याचे काम पावसामुळे ४-५ दिवस ठप्प  


 वेब टीम नगर-मध्यंतरीच्या विश्रांती नंतर परतीच्या पाऊसाने हजेरी लावल्यावर शहरातील रस्त्यांची दुरावस्था पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे शहरात एकही रास्ता शिल्लक नाही कि ज्यावर खड्डे नाहीत. 

शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांची मालिकाच सुरु होते त्यापैकी जुनी महानगर पालिका रस्ता ,सबजैल रोड, पटवर्धन चौक , सांगळे गल्ली चौक , तेथून अमरधाम कडे जाणारा रस्ता, लक्ष्मी कारंजा चौक , शनी गल्ली , गाढवे मैदानकडे जाणारा रस्ता , आदी रस्त्यांवर अगणित खड्डे पडले आहेत. उन्हाळा संपताना रस्त्याची कामे काढल्याने या पैकी बऱ्याच ठिकाणी रास्ता खोदण्यात आला. आणि त्यानंतर लगेचच पावसाळा सुरु झाल्याने रस्त्याची दुरुस्तीची कामं ठप्प झाली. त्याही वेळी आता पाच महिने नगरकरांना खाद्यातील रस्त्यातूनच प्रवास करावा लागणार असे म्हटलेच होते. 

या खड्ड्यातील रस्त्यांमध्ये प्रवास करताना अनेकदा  अपघातांना निमंत्रण मिळत होते तीच परिस्थिती  पुन्हा उद्भवली आहे.  शहरातून वाहने चालवणे मोठे जिकिरीचे बनले आहे.सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मणक्यांचे विकार फारसे चव्हाट्यावर आले नाहीत अन्यथा पाठ,मान, माणक्याच्या  विकाराचे  दवाखाने तेजीत चालताना दिसले असते त्यामुळे कोरोनाचे आभार मानावेत कि काय असा प्रश्न नगरकरांना पडत आहे.

शहरात २-३ दिवसात खड्डे बुजवण्याचे काम महापालिकेच्या वतीने करण्यात आले ,मात्र पाऊस सुरु झाल्याने ४-५ दिवस काम थांबवण्यात आले. त्यामुळे ग्राऊटींग केलेल्या खड्ड्यांमध्ये भराव टाकून डांबरी कच टाकण्यात आलेल्या भागात खडी आणि कच रस्त्यावर पसरल्याचे चित्र दिसत असून अनेक दुचाकी वाहने त्यावरून घसरल्याच्या तक्रारी आल्या आहेत. 

ग्राऊटींग करून खड्डे भरणार - सुरेश इथापे 

शहरातील कड्ड्यांबाबत बांधकाम विभागाचे अभियंते सुरेश इथापे यांच्याशी  चर्चा केली असता सध्या महापालिका नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून खड्डे बुजविण्याचे काम हाती घेत आहे. यात रस्तावर पडलेल्या खड्ड्याच्या आजूबाजूचा कमकुवत भागही खणून काढला जातो त्यात मशीनने पडलेली खडी दबाई  करून घेतो त्यावर डांबर आणि बारीक कच टाकून पुन्हा दबाई करून काही दिवसांनंतर खड्ड्याला डांबर आणि काच यांनी भरून पुन्हा दबाई केली जाते. अश्या प्रकारे ३-४ वेळा रोलिंग झाल्याने रस्त्यांना मजबुती येते यालाच ग्राऊटींग असे म्हणतात सध्या माळीवाडा जुनी महापालिका , पटवर्धन चौक , लक्ष्मी कारंजा , आदी भागात खड्ड्याचे ग्राऊटींग करण्याचे काम चालू आहे.शहरातील खड्डे बुजवण्यासाठी साधारणता एक कोटी रुपयांचे बजेट ठेवण्यात आले असून २३ ते २५ लाखांच्या दरम्यान एकेका  विभागात तरतूद करण्यात अली आहेत .  

     





Post a Comment

0 Comments