आरोग्य आहार

 आरोग्य आहार 

व्हेजीटेबल शेवई उपमा 


साहित्य :

 २ वाटी गव्हाच्या शेवया , जागर , मटार , फ्लॉवर , स्वीट कॉर्न बीन्स , हिरवी मिरची , कांदा, उडीद डाळ , कडीपत्ता , कोथिंबीर , ओला नारळ , लिंबू. 

कृती :

 प्रथम बारीक केलेल्या गव्हाच्या शेवया घेणे या शेवया साजूक तुपावर छान गुलाबी रंगावर खरपूस भाजून घेणे. कढईत तेल तापवून त्यात मोहोरी टाकणे मोहोरी तडतडल्या नंतर त्यात उडीद डाळ टाकणे , उडीद डाळ गुलाबी रंगावर आल्यानंतर त्यामध्ये कडीपत्ता हिरवी मिरची टाकणे, त्यानंतर कांदा व सर्व बारीक चिरलेल्या भाज्या टाकणे. आधण ठेऊन वाफ येऊ द्यावी. साधारणतः २ वाटी शेवयांसाठी ३ वाटी पाणी फोडणीत टाकणे त्यामध्ये लिंबू मीठ चवीपुरती  साखर टाकावी . पाण्याला उकळी आली कि भाजलेल्या शेवया त्यामध्ये घालाव्यात . २ ते ३ मिनटे झाकण ठेऊन शिजू द्याव्यात गरज पडल्यास पाणी टाकावे . एक वाफ आल्यानंतर गॅस बंद करावा. ओला नारळ बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करावे. 


टीप :

 बाजारात मिळणाऱ्या नूडल्स पेक्षा गव्हाच्या शेवया जास्त पौष्टिक असतात पचायलाही हलक्या असतात. भरपूर भाज्यांमुळे फायबरही मिळते . चवीलाही खूप चांगला होतो . मुलांना आवडत असल्यास त्यावर चीज किसून टाकले तरी चालते. 

अनुपमा वैभव जोशी : ९४०४३१८८७५

* Dietitian and Nutritionist 

* B.Sc in Food Science and Nutrition 

* Diploma in Nutrition and Health Education

* Diploma in Yog Shikshak 


 

Post a Comment

0 Comments