" तुझं माझं जमतंय " खुमासदार मालिका

" तुझं माझं जमतंय " खुमासदार मालिका 


वेब टीम नगर :अहमदनगर फिल्म कंपनी आणि अनुष्का मोशन पिक्चर्स अॅण्ड एंटरटेनमेंटस घेऊन येत आहेत. अस्सल नगरी मातीत तयार होणारी मालिका  'तुझं माझं जमतंय' ही झी समुहाच्या अग्रगण्य झी युवा (Zee Yuva) या वाहिनीवर सुरु होणारी मालिका म्हणजे शेवंताच्या (अपूर्वा नेवळेकर) च्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. कारण या मालिकेद्वारे ती पुन्हा एकदा धमाकेदार कमबॅक करणार आहे. शेवंता यामध्ये 'पम्मी'ची भूमिका साकारणार आहे. ही एक लाईट कॉमेडी सीरिअल असून यामध्ये तिची भूमिका तितकीच दमदार आणि ग्लॅमरस असणार आहे.

प्रोमोला उदंड प्रतिसाद

तडक्याला आहे पम्मी तर होणारच ना लव्हस्टोरी यम्मी... नवीन मालिका "तुझं माझं जमतंय" लवकरच... हे सांगत रिलीज झालेल्या प्रोमोला सर्वच थरातून उदंड प्रतिसाद मिळत आहे. प्रोमोमध्ये अपूर्वा नेवळेकर(रात्रीस खेळ चाले फेम) ग्लॅमरचा तडका देताना दिसत आहे. तिच्या सोबत या मालिकेत 'रोशन विचारे' आणि 'मोनिका बागुल' ही जोडी दिसणार आहे. दरम्यान यावर कमेंट आणि कौतुकाचा चांगलाच वर्षाव होत आहे.  

नव्वद टक्के  नगरी कलाकार

या मालिकेच संपूर्ण चित्रिकरण आणि निर्मिती नगर मधेच होणार असुन विशेष म्हणजे मालिकेसाठी काम करणारे ९०टक्के  लोक नगरचे आहेत. 

या मालिकेची कथा आणि संकल्पना अमित अशोक खताळ यांची आहे.

यात नगरचे कलाकार मोहनीराज गटणे, राहुल सुराणा, अवंती होशिंग, मेघमाला पठारे, वैष्णवी घोडके, अमित रेखी, रुपाली मुनोत, चंद्रकांत जाधव, प्रणित मेढे (प्रोजेएक्ट हेड) रविंद्र पोपट नवले(कार्यकारी निर्माता), योगेश इंगळे (कला दिग्दर्शक), मयुरी मुनोत-मोरे (वेशभुषा) अंकुश काळे, मंगेश जोंधळे (निर्मिती व्यवस्थापक), अनिरुद्ध तिडके, यांसह इतर काही जणांचा समावेश आहे. नुकतेच या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. यावेळी कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेता सर्व गोष्टींचे पालन केले जात आहे.  

अहमदनगर महाकरंडकने  रचला पाया 

महाराष्ट्रातील सर्वात मोठी एकांकिका स्पर्धा अहमदनगर महाकरंडकपासून सुरु झालेला हा प्रवास आधी चित्रपट निर्मिती आणि आता टेलिव्हिजन पर्यंत येऊन पोहोचला आहे. यानिमित्ताने अहमदनगरच्या कलाकारांना एक मोठे व्यासपीठ आणि करिअरला दिशा मिळत आहे.   

उद्योजक 'नरेंद्र शांतीकुमार फिरोदिया' आणि 'स्वप्नील संजय मुनोत' यांची निर्मिती असलेल्या या मालिकेच्या दिग्दर्शनाची जबाबदारी मंदार कुलकर्णी व सह-दिग्दर्शन संदीप दंडवते सांभाळत आहे.

ही मालिका प्रेक्षकांना झी युवा वाहिनीवर येत्या ४ नोव्हेंवरपासून सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता पाहायला मिळणार आहे.


Post a Comment

0 Comments