पंतप्रधानांनी केली स्वामित्व योजने ची सुरवात

 पंतप्रधानांनी केली स्वामित्व योजने ची सुरवात 


वेब टीम नवी दिल्ली:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे स्वामित्व योजनेची सुरूवात केली. या महत्वाकांक्षी योजनेची सुरुवात केल्यानंतर सुमारे १ लाख लोकांना प्रॉपर्टी कार्ड वितरीत केले जातील. हे कार्ड मोबाइल फोन आणि एसएमएसद्वारे पाठवण्यात आलेल्या लिंकने डाउनलोड केले जाऊ शकेल.

पंचायत राज मंत्रालयाने सुरू केलेल्या या योजनेमुळे ६ राज्यांमधील ७६३ पंचायतींच्या एक लाख लोकांना लाभ मिळणार आहे. यात उत्तर प्रदेशातील ३४६, हरयाणातील २२१, महाराष्ट्रातील १००, मध्य प्रदेशातील ४४, उत्तराखंडातील ५० आणि कर्नाटकातील २ पंचायतींचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची सुरुवात केल्यानंतर ज्या लोकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे, असा लोकांची वार्तालाप केला. या दरम्यान आता आपल्या संपत्तीवर कोणीही वाकडी नजर ठेवू शकणार नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

प्रॉपर्टी कार्ड मिळाल्यामुळे आता लाभार्थ्यांना सामाजिक आणि आर्थिक मजबुती मिळाली आहे, अशी लाभार्थ्यांची भावना असल्याचे लाभार्थी प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. या कार्डाद्वारे आता आम्हाला बँकांकडून कर्ज मिळवणे अगदी सहज सोपे झाले आहे, असे पंतप्रधान मोदी यांच्याशी  बोलतांना  लाभार्थी म्हणाले. 

आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत देशाने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे, असे मोदी म्हणाले. स्वामित्व योजना, गावात राहणाऱ्या आमच्या बंधु-भगिनींना आत्मनिर्भर बनवण्यासाठी उपयोगी पडणार आहे. या योजनेमुळे गावातील मालकीहक्कांबाबतचे सुरू असलेले वाद संपुष्टात येतील, असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला.


Post a Comment

0 Comments