आरोग्य आहार

 

आरोग्य आहार

ओट्स व्हिट चीज पराठा

साहित्य :

 कणिक वाटी , ओट्स फ्लेक्स वाटी , / वाटी नाचणी सत्व, / वाटी डाळीचे पीठ, वाटी , बारीक किसलेले बीट रसासकट आलेलसूण गिरवी मिरची पेस्ट , तीळ , ओवा , मीठ , तिखट , हळद , चाट मसाला ,  पावभाजी मसाला

कृती :

सर्व पीठे एकत्र करून घ्यावीत, त्यामध्ये किसलेले बीट रसासकट, आलेलसूण हिरवी मिरची पेस्ट , तिखट मीठ , हळद , घालून मळून घेणे.

प्रथम छोटी गोल पोळी लाटून त्यावर चीज किस पेरून घ्यावे नंतर त्या पोळीला त्रिकोणी घडी घालून त्रिकोणी आकारातच लाटून घेणे. दोन्ही बाजूने गुलाबी रंगावर भाजून घेणे .तव्यावरून उतरवल्यावर लगेचच थोडा चाट मसाला भुरभुरणे. मुलं हे पराठे खूप आवडीने खातात. बीटही खाल्ले जाते.

टीप:

 ओट्समध्ये फायबर भरपूस प्रमाणात असते.हे फायबर ब्लडशुगर कोलेस्ट्रॉल कमी करते. तसेच अन्नपचन सुधारण्यास मदत होते.बीट  मधील मिनरल व्हिटॅमिन "C" यामुळे तसेच चीजमधील प्रोटीनमुळे हे पराठे खूपच हेल्दी होतात.


अनुपमा वैभव जोशी : ९४०४३१८८७५

* Dietitian and Nutritionist 

* B.Sc in Food Science and Nutrition 

* Diploma in Nutrition and Health Education

* Diploma in Yog Shikshak 




Post a Comment

0 Comments