आरोग्य आहार

आरोग्य आहार 


आपले स्वास्थ्य हे आपल्या आहाराशी जोडले गेले आहे. आपला आहार चांगला तर आपले स्वास्थ्य चांगले . पण आपण सर्वांनी आपल्या पारंपरिक आहाराची जागा जंक फुड आणि पाश्चिमात्य आहाराला दिली आणि त्यानंतर आपले आरोग्य बिघडू लागले . योग्य आहारामुळे जसे आपले आरोग्य चांगले राहते तसेच चुकीच्या आहारपद्धती मुळे आपल्या शरीरात अनेक रोग निर्माण होतात. आणि अश्याच चुकीच्या आहारपद्धतीमुळे आपण अनेक आहारजन्य आजारांना बळी  पडू लागलो आहोत. लठ्ठपणा , मधुमेह, बी.पी , थायरॉईड या सारखे अनेक आजार बळावत आहेत . 

आपले भरतीय पदार्थ  योग्य वेळेला योग्य प्रमाणात सेवन केल्यास आपल्याला ह्या आजारांपासून सहजपणे दूर राहता येईल. म्हणूनच आपण आपले भारतीय पदार्थ वापरून पोषण मूल्यांनी भरपूर अश्या काही पाककृती आपल्यासाठी घेऊन येत आहोत .आपल्या कुटुंबियांना त्या नक्कीच फायद्याच्या ठरतील. 

लाल भोपळ्याच्या पुऱ्या 

साहित्य- २ वाटी कणिक, पाव वाटी हरभरा डाळीचे पीठ , पाव वाटी नाचणी सत्व, ३ मोठे चमचे ज्वारीचे , ३ मोठे चमचे तांदळाचे पिठ ,तीळ , ओवा , तिखट , मीठ , हळद ,धने-जिरे पावडर , उकडलेला लाल भोपळा ,कोथिंबीर . 


कृती - प्रथम सर्व पीठे  घेणे त्यामध्ये भरपूर उकडलेला लाल भोपळा , बारीक चिरलेली कोथिंबीर , तिखट , मीठ , तीळ , ओवा , हळद, घालून पाणी न घालता भोपळ्याच्या ग्रामध्येच चांगले घट्ट मळून घेणे . जर गरज भासली तरच पाण्याचा हात लावणे . छोटे छोटे गोळे करून पुऱ्या लाटून तळून घेणे. 


ओल्या नारळाच्या चटणी सोबत सर्व्ह करणे . सर्व वेगवेगळी पीठे लाल भोपळ्यातील व्हिटॅमिन "सी" आणि आणि तिळातिल कॅल्शियम या मुळे  मुलांसाठी व मोठ्यांसाठी ह्या पुऱ्या खूप चविष्ट व पौष्टिक आहेत. 


पोषण मूल्य: 

लाल भोपळा -

 १. व्हिटॅमिन A आणि व्हिटॅमिन C चा उत्तम स्रोत . 

 २. प्रतिकारक शक्ती वाढते . 

३. पोषण मूल्यांनी भरपूर आणि कमी कॅलरी असल्याने वजन कमी करण्यास मदत होते. 

४. फायबर चा उत्तम स्रोत 

५ . आहारामध्ये वापरण्यास अत्यंत सोपा. 




Post a Comment

2 Comments

Emoji
(y)
:)
:(
hihi
:-)
:D
=D
:-d
;(
;-(
@-)
:P
:o
:>)
(o)
:p
(p)
:-s
(m)
8-)
:-t
:-b
b-(
:-#
=p~
x-)
(k)