कोरोनाच्या नावाखाली खाजगी हॉस्पिटलची दुकानदारी:विनोद गायकवाड


कोरोनाच्या नावाखाली खाजगी हॉस्पिटलची दुकानदारी:विनोद गायकवाड

वेब टीम नगर: शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना खाजगी हॉस्पिटलमध्ये सुरु असलेले कोविड सेंटरकडून रुग्णांच्या नातेवाईकांकडून बीलापोटी अधिक पैश्याची मागणी केली जात आहे. अशा कोविड सेंटरवर साथ रोग नियंत्रण कायद्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्याची मागणी विनोद गायकवाड यांनी केली आहे.      

कोरोना रुग्णांसाठी शासकीय दर निश्‍चित केले असताना सुध्दा खाजगी कोविड सेंटरमध्ये अंधाधुंदी कारभार सुरु आहे. कोरोनाच्या नावाखाली खाजगी हॉस्पिटलने दुकानदारी सुरु केली असून, सर्वसामान्य नागरिकांची पिळवणूक होत आहे. रुग्णांकडून हॉस्पिटल प्रशासन तर ऑडिटर हॉस्पिटलद्वारे मलिदा लाटत आहे. या साखळीमध्ये सर्वसामान्य रुग्णाचे कुटुंबीय भरडले जात आहे. अनेकांच्या तक्रारी असून देखील आता पर्यंत किती हॉस्पिटलवर कारवाई झाली याचा देखील प्रशासनाने खुलासा करण्याची गरज आहे. ही परिस्थिती न सुधारल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा विनोद गायकवाड यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments