हाथरस येथे झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश

 



हाथरस  बलात्कार आणि हत्येप्रकरणी

 सीबीआय चौकशीचे आदेश

वेब टीम नवी दिल्ली :हाथरस प्रकरणात योगी आदित्यनाथ सरकारने सीबीआय तपासाची शिफारस केली आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी सीबीआय चौकशीची मागणी केली, जी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आहे. यूपीच्या सीएम कार्यालयाच्या वतीने ट्विट केले की, "मुख्यमंत्री योगी यांनी सीबीआयला संपूर्ण हातरस प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत."

यूपीचे डीजीपी आणि गृहसचिव अवनीश अवस्थी यांनी पीडितेच्या कुटुंबाशी भेट घेतली होती आणि त्यांच्या तक्रारी आणि त्यांच्या मागण्या ऐकल्या आहेत. कुटुंबाची भेट घेतल्यानंतर अधिकाऱ्यांनी पीडित कुटुंबाच्या सर्व मागण्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमोर ठेवल्या, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी रात्री उशिरा सीबीआय चौकशीचे आदेश दिले. यापूर्वी यूपी सरकारने या प्रकरणाची एसआयटी चौकशीचे आदेश दिले होते. मात्र, पोलिसांवर त्यांचा विश्वास नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.


Post a Comment

0 Comments