राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी घेतली
हाथरस पीडितेच्या कुटुंबियांची भेट
भेटीनंतर या परिवारानं उपस्थित केलेले पाच प्रश्न प्रियांका गांधी यांनी योगी सरकारला विचारले आहेत
वेब टीम लखनौ : काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी शनिवारी सायंकाळी हाथरसमध्ये पीडितेच्या कुटुंबियांची भेटी घेतली. राहुल आणि प्रियंकाने पीडितेचा भाऊ, वडील आणि आईशी बंद खोलीत सुमारे एक तास संवाद साधला. यावेळी काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरीही त्यांच्यासमवेत तेथे होते. या भेटीनंतर या परिवारानं उपस्थित केलेले पाच प्रश्न प्रियांका गांधी यांनी योगी सरकारला विचारले आहेत.
त्यात हाथरास च्या जिल्हाधिकाऱ्यांना तेथून हटवावे त्यांची कोठेही मोठ्यापदावर नेमणूक करूनये. सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून पूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी . आमच्या मुलीचे शव आम्हाला ना विचारता पेट्रोल टाकून का जाळले ?,आम्हाला वारंवार खोटी माहीती का दिली जाते अश्या प्रश्नाचा त्यात समावेश आहे.
0 Comments