गरीब देशांना लस मिळणे कठीण?

 



गरीब देशांना लस मिळणे कठीण? 

कोवॅक्ससमोर  संकट

वेब टीम लंडन:  करोनाच्या संसर्गावर मात करण्यासाठी लस विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर, दुसरीकडे जगभरातील गरीब, विकसनशील देशांना लस पुरवठा करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. जगभरातील गरीबांपर्यंत लस पुरवठा करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या 'कोवॅक्स' योजनेसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. कोवॅक्ससमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे.

कोवॅक्सला लस पुरवठा करण्यासाठी मालवाहू विमान, लस ठेवण्यासाठी फ्रीज व इतर सुविधांच्या कमतरतेचा फटका बसत आहे. त्याशिवाय लस कंपन्यांसोबत श्रीमंत देशांनी लशीसाठी करार केला आहे. त्यामुळेही कोवॅक्ससमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.

या देशांनी दिला नकार

चीन, फ्रान्स, जर्मनी, रशिया आणि अमेरिकेसारख्या मोठ्या देशांनी कोवॅक्समध्ये अद्याप सहभाग नोंदवला नाही. अमेरिका व इतर देशांनी कोवॅक्समध्ये सहभागी होण्यास थेट नकारच दिला आहे. या देशांनी करोनावरील संभाव्य लशीसाठी २०२१ मध्ये उत्पादीत होणाऱ्या लशीच्या एका मोठ्या हिस्स्यासाठी औषध कंपन्यांसोबत थेट करार केला आहे.

करोनाविरोधातील लशीकरण मोहिमेतून गरीब, विकसनशील देश वंचित राहू नये यासाठी कोवॅक्सची योजना तयार करण्यात आली आहे. कोवॅक्समध्ये जागतिक आरोग्य संघटनेसह जगातील ६० टक्के बालकांसाठी लशीकरण मोहीम राबवणारी गावी  ही सार्वजनिक-खासगी संस्था आदींचा सहभाग आहे. गावी या संस्थेला बिल अॅण्ड मेलिंडा गेट्स फाउंडेशनकडून मोठ्या प्रमाणावर निधी देण्यात येतो.



Post a Comment

0 Comments