राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ शहर कॉंग्रेसची रस्त्यावर उतरून निदर्शने

 




राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ शहर कॉंग्रेसची रस्त्यावर उतरून निदर्शने

वेब टीम नगर: अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने उत्तर प्रदेश सरकारने राहुल गांधी प्रियंका गांधी यांच्या समवेत केलेल्या गैर वर्तणुकी बाबत तीव्र निषेध  करून रस्ता रोको करण्यात आला व पोलिसांनी अटक केली यावेळीशहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले या वेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिप चव्हाण अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आजू शेख, सोनू शेख, मोबीन शेख, गणेश आपरे, शरीफ सय्यद यांच्यासह कार्यकर्ते फार मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते यावेळी काळे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तर रस्ता रोको करण्यात आले यावेळी काँग्रेस कार्यकर्ते अत्यंत आक्रमक झाले होते मोदी सरकार आणि योगी सरकारच्या निषेधाच्या घोषणा कार्यकर्त्यांनी यावेळी दिल्या यावेळी बोलताना किरण काळे म्हणाले की आदरणीय राहुल गांधी प्रियंका गांधी यांच्या वरती योगी सरकारने केलेली कारवाई म्हणजे भारताच्या लोकशाही मधला काळा दिवस आहे त्या ठिकाणी बोलण्याची सुद्धा मुळा मोदीच्या सरकारने ठेवली नाही आणि हिटलरशाही असेच वाढत गेली तर या देशांमध्ये सर्वसामान्य माणसाला जगणे मुश्कील होणारे बलात्कार पीडित भगिनी संदर्भांमध्ये त्याठिकाणी सखोल चौकशी होत आवश्यक ती कारवाई व्हायला पाहिजे काँग्रेसच्या नेत्यांवर अशा प्रकारची कारवाई करून आवाज दाबण्याचा प्रयत्न हे सरकारच्या वतीने करण्यात येत आहे या वेळी पोलिसांनी काळे यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आणि तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये नेले.

Post a Comment

0 Comments