पोलीस प्रशासन,घर घर लंगर सेवा समितीच्या वतीने ५२ लोक कलावंतांना किराणा वाटप

  
पोलीस प्रशासन,घर घर लंगर सेवा समितीच्या 

वतीने ५२ लोक कलावंतांना किराणा वाटप.

वेब टीम नगर  : अहमदनगर पोलीस प्रशासन व घर घर लंगर सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने नगर शहर व तालुक्यातील ५२ लोक कलावंतांना जिवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. येथील पोलीस मुख्यालयात  झालेल्या या कार्यक्रमास पोलीस उपअधिक्षक संदिप मिटके, घर घर लंगर सेवा समितीचे प्रमुख हरजितसिंग वधवा, जेष्ठ पत्रकार सुधीर लंके, लोककला अभ्यासक भगवान राऊत, प्रबोधनकार सारिका देवकाते, शाहीर वसंत डंबाळे आदी मान्यवर उपस्थित होतेकोरोना महामारीचे संकट व लॉक डाऊनमुळे गेल्या ७ महिन्यांपासून पारंपरिक लोककलावंतांचे जगणेदेखील मुश्कील आहे. त्यांच्या व्यथा लोककला अभ्यासक भगवान राऊत यांनी प्रसार माध्यमांसमोर मांडल्या होत्या. त्याची दखल घेत अहमदनगर चे पोलीस उपअधिक्षक संदिप मिटके व घर घर लंगर सेवा समितीचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते हरजितसिंग वधवा यांनी पुढाकार घेत, नगर शहर व तालुक्यातील पोतराज, हलगी वादक, शाहीर, किर्तनकार, प्रबोधनकार, तुतारीवादक, वाजंत्री वादक, सूर व सनई वादक अशा ५२ पारंपरिक लोककलावंतांना अन्नधान्य व किराणा सामानाच्या किटचे वाटप करण्यात आले.त्यामध्ये ५ किलो गव्हाचे पीठ, २ किलो तांदूळ, २ किलो साखर, १ किलो तूरडाळ, चहा पावडर, मीठ, मसाला हळद पावडर, मिर्ची पावडर, कांदा लसूण पेस्ट, अंघोळीचा व कपडे धुण्याचा साबण अशा वस्तूंचा समावेश होता. किराणा सामानाची किट मिळताच उपस्थित लोक कलावंतांच्या चेहऱ्यावर समाधान दिसले. लॉक डाऊनमुळे अनेक लोक कलावंतांची उपासमार सुरू होती. अशा परिस्थितीत पोलीस प्रशासन व घर घर लंगर सेवा समितीच्या वतीने देण्यात आलेल्या मदतीमुळे लोक कलावंतांनी आभार व्यक्त केले.नगर शहर व तालुक्यातील पारंपरिक लोक कलावंतांबरोबरच देवळाली प्रवरा ता. राहुरी येथील पिंगळा जोशी तसेच लोणी तालुका राहता, कोपरंगाव व भोकर, खोकर ता. श्रीरामपूर येथील वासुदेवांना देखील किराणा सामानाचे लवकरच वाटप करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपअधिक्षक संदिप मिटके व हरजितसिंग वधवा यांनी दिली. या उपक्रमासाठी माजी नगरसेवक भाऊसाहेब उडानशिवे, युवा कार्यकर्ते विकास उडानशिवे, शाहीर वसंत डंबाळे, शाहीर दिलीप शिंदे, प्रबोधनकार सारिका देवकाते यांच्या सह घर घर लंगर सेवा समितीचे कार्यकर्ते प्रितपाल सिंग धुप्पड, जनक शेठ आहुजा, जय रंगलानी, राहुल बजाज, कैलास नवलानी, राजा नारंग, अनिल आहुजा, सुनिल थोरात कमलेश गांधी, प्रमोद पंतम, शरद बेरड, पुरुषोत्तम बेट्टी, अनिल जग्गी, किशोर मुनोत आदींनी परिश्रम घेतले.Post a Comment

0 Comments