रुग्णसेवेची प्रकाशवाट स्नेहालयचे रुग्णालय उजळेल : ना.गडाख

 

रुग्णसेवेची प्रकाशवाट स्नेहालयचे रुग्णालय उजळेल : ना.गडाख

वेब टीम नगर : एड्सग्रस्तांना ३  दशकांपूर्वी  जेव्हा  कोणी स्पर्श करीत नव्हते, तेव्हा स्नेहालय परिवाराने त्यांची  सेवा-सुश्रुषा निष्ठेने करून रुग्णसेवेची एक वैश्विक प्रकाशवाट उजळली. स्नेहालयचे नवीन ‘स्नेहदिप कोविड  रुग्णालय’ रुग्णसेवेची नवी प्रेरणा निर्माण करील असा विश्वास महाराष्ट्राचे जलसंधारण मंत्री ना.शंकरराव गडाख यांनी व्यक्त केला.

स्नेहालय संस्थेतील केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर तर्फे आजपासुन ४५ रुग्णांची सोय असलेले  ‘स्नेहदिप कोविड  रुग्णालय’ सुरू झाले. ना.गडाख यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी राजकीय, उद्योग आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

नगरच्या औद्योगिक वसाहतीमधील कामगार आणि त्यांचे कुटुंबीय , पंचक्रोशीतील ग्रामीण भागातील गरीब आणि गरजू नागरिक यांना या रुग्णालया मुळे अहोरात्र उपचार उपलब्ध झाले आहेत. आमी (अहमदनगर आसोसिएशन ऑफ मनुफॅक्चरिंग इंडस्ट्रीज)संघटनेचे या उपक्रमाला विशेष सहकार्य मिळाले आहे .

डॉ. सचिन पानसरे ,डॉ.सागर गडाख ,डॉ.आतिश केदारी , डॉ.शुभम गडाख यांनी पुढाकार घेऊन स्नेहालय संस्थेच्या सोबतीने हे स्वतंत्र  कोविड  रुग्णालय सुरू केले. यावेळी स्नेहालयचे वैद्यकीय सेवा प्रकल्प प्रमुख डॉ.सुहास आणि डॉ.स्वाती घुले ,डॉ.निलेश परजणें,  संस्थेच्या ज्येष्ठ मार्गदर्शक, डॉ. मार्सिया वॉरन , उद्योजक मिलिंद एकनाथ कुलकर्णी, जयकुमार मुनोत, राजीव गुजर ,संजय गुगळे, बाल कल्याण समितीचे सदस्य  प्रवीण मुत्याल  आणि अध्यक्ष हनीफ शेख, स्नेहालय संस्थेचे समन्वयक अनिल गावडे, मूळचे इंग्लंडमधील भारत सेवक निक कॉक्स आणि  श्रीमती जॉयस कोनोली, आमी(अहमदनगर आसोसिएशन  ओफ मनुफॅक्चरिंग इंडस्ट्रीज)संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कटारिया, ए.के.पांजा, दिलीप अकोलकर आदी उपस्थित होते.

 कोविड संसर्ग सुरू झाल्यावर  तातडीने मास्क बनविण्यासाठी  कारखाना सुरू करून दरमहा १० लाखांवर मास्क निर्मिती येथील उद्योजक सुनील कानवडे यांनी केली. ना.गडाख यांच्या हस्ते कानवडे यांचा गौरव करण्यात आला.

 विविध सामाजिक संस्था आणि संघटनांच्या माध्यमातून हजारो गरीब आणि गरजूंना कानवडे यांनी मोफत मास्क वाटप केले ,याचा सर्व नगर जिल्हावासियाना सार्थ अभिमान वाटतो,  असे ना.गडाख म्हणाले.स्नेहालय संस्थेने अहमदनगर शहरात १५ खाटांचे नि:शुल्क अलगीकरण केंद्र गरीब-गरजू रुग्णांसाठी मागील दोन महिन्यांपासून चालवले आहे. या शिवाय कोविड  मुळे नोकरी आणि राहण्याचे ठिकाण गमाविलेल्या विविध संस्थांमधील १८ वर्षे पूर्ण झालेल्या अनाथ-निराधार मुलां-मुलींना आपल्या हिम्मतग्राम  पुनर्वसन संकुल (इसळक, ता.जि.अहमदनगर) या प्रकल्पात खुला निःशुल्क आश्रय ५ मार्च २०२० पासून दिला आहे.

अहमदनगर शहरात बाहेरच्या देशातून वंदे भारत योजनेअंतर्गत येणाऱ्या नागरिकांसाठी आठ दिवसांचे मोफत अलगीकरण केंद्र केडगाव येथील स्नेहदीप केंद्रात १० जून पासून चालविले जाते आहे. अहमदनगर औद्योगिक वसाहतींमधील  स्नेहालय पुनर्वसन संकुलात नव्याने सुरू झालेल्या रुग्णालयामुळे गरीब आणि गरजू रूग्णांची परवडणाऱ्या दरात दर्जेदार उपचार मिळण्याची सोय झालेली आहे.

येथील वैद्यकीय सेवांसाठी 9561878815, या मोबाईल क्रमांकावर संपर्काचे आवाहन स्नेहालय परिवाराने केले आहे

Post a Comment

0 Comments