डॉ. प्रशांत पटारे ग्रामिण जनतेसाठी माणसातील देवच



 डॉ. प्रशांत पटारे ग्रामिण जनतेसाठी माणसातील देवच 

महाडिक : स्मायलिंग अस्मिता शिवजयंतीला मॅक केअर हॉस्पिटलच्या सर्व सदस्यांची बैलगाडीतून मिरवणूक काढणार


वेब टीम नगर :छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक येथे स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मॅक केअर हॉस्पिटलचे संचालक डॉ प्रशांत पटारे यांच्या सत्काराचे आयोजन केले होते. यावेळी भारतीय सैन्य दलातील हवालदार पदावर कार्यरत असलेले शिवाजीराव महाडिक हे अध्यक्ष तर प्रमुख अतिथी म्हणून विद्यार्थी संघटनेचे कार्यवाह शुभम पांडूळे आणि हिंद सेवा मंडळाचे उपकार्याध्यक्ष डॉ पारस कोठारी उपस्थित होते. डॉ प्रशांत पटारे यांना भगवा फेटा बांधून बांबूचे रोपटे देऊन स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेच्या वतीने गौरविण्यात आले. यावेळी डॉ पटारे यांच्या शारीरिक प्राणवायू आणि तापमानाची देखील तपासणी केली गेली.

यावेळी अध्यक्ष पदावरून शिवाजीराव महाडिक म्हणाले की सध्या कोरोना काळात मोठ्या शहरात वैद्यकीय क्षेत्रातील रुग्णांच्या बाबतीत थोडीबहुत आर्थिक लूट वाचनात आली.अनेकांनीतर घाबरून दवाखानेच बंद केले, परंतु संघर्षाचा इतिहास असलेल्या अहमदनगरमध्ये मात्र डॉ प्रशांत पटारे यांनी स्वताच्या नेतृत्त्वाखाली कोरोनाविरुध्द लढा उभारत सर्व सामान्य माणसाला मनापासून सेवा देत नवसंजीवनी दिली. यालढाईत त्यांचा सुध्दा एक सहकारी सरदार धारातीर्थी पडला परंतु मॅक केअर हॉस्पिटलच्या वैद्यकीय सैनिकांनी हार न मानता येईल त्या परिस्थितीला डॉ पटारे यांच्या नेतृत्वाखाली सामोरे जायचे ठरवले. ग्रामिण भागातील आमच्या सारख्यांसाठी हक्काचा दवाखाना म्हणून आम्ही मॅक केअरच्या कोव्हिड सेंटरकडे पाहत आहोत.पटारेंनी नेहमीच रूग्णांची आर्थिक बाजू समजून घेऊन त्यांना सहकार्य केले आहे.सध्याच्या काळात असं सेवाव्रत काम करणारे सर्वच डॉक्टर हे माणसाच्या रुपातील देवच आहे असे भावोद्गार महाडिक यांनी व्यक्त केले.

डॉ कोठारी यांनी देखील डॉ पटारे यांच्या नेहमीच होणा-या रुग्ण सहकार्याबद्दल उपस्थितांना माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यी संघटनेचे कार्यवाह शुभम पांडूळे म्हणाले की अपघात झाले गडुघ्याचे किंवा मनक्याचे आजार उद्भवले तर मेट्रो शहरात मोठ्या दवाखान्यात भल्यामोठ्या खर्चाला सामोरे जावे लागत, परंतु डॉ पटारे यांच्यामुळे आता मात्र नगरमध्येच सर्वोत्तम उपचार सेवेच्या माध्यमातून केले जातात.ग्रामिण भागातील अनेकांना डॉ पटारे हे देवदूतच वाटतात; कारण जे पायमोडून घरात बसले होते ते आता खेळू बागडू लागले आहेत. पटारेंनी शालेय जीवनापासून विद्यार्थी चळवळीत देखील प्रसध्दीच्या पाठीमागे न लागता मनापासून काम केले आहे.कोरोना काळातही हजारो गरजवंतांना मास्कचे वाटप केले आहे; त्यामुळे आपण सुध्दा याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येत्या १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीला मॅक केअर हॉस्पिटलच्या सर्व सदस्यांची बैलगाडीतून मिरवणूक काढून डॉ प्रशांत पटारे यांच्या वजना इतकी साखर वाटून मिरवणूकीचा आनंद साजरा करू यावेळी स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष यशवंत तोडमल यांनी देखील डॉ. पटारे यांनी दोन वर्षे विद्यार्थ्यांसाठी केलेल्या कामाची माहिती दिली. जास्त वेळ न दवडता डॉ पटारे यांनी आनंद व्यक्त करत दवाखान्यात जात आहे मात्र नेहमीच सामाजिक कार्यात सहभागी असेन असा विश्वास व्यक्त करत दवाखान्याकडे प्रस्थान केले. कार्यक्रमाला आवर्जून अमेरिकेतील निलेश महाले दृश्यशावक पद्धतीने सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जनसंकल्प फाउंडेशनचे अध्यक्ष महेश भोर यांनी केले. डॉ पटारे यांच्या कार्याची ओळख धीरज कुमटकर यांनी करून दिली तर आभार प्रदर्शन भाऊ निकम यांनी केले. कार्यक्रमासाठी सचिन सापते, संभाजीराजे कदम, सागर मांजुरे, अक्षय शेळके, विनायक सुरवसे यांनी अथक परिश्रम घेतले आहे.

Post a Comment

0 Comments