‘हार्मोन्सची हार्मोनी’ या विषयावर रविवारी ऑनलाईन मोफत व्याख्यान

  ‘हार्मोन्सची हार्मोनी’ या विषयावर रविवारी ऑनलाईन मोफत व्याख्यान

वेब टीम  नगर: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दिवसेंदिवस या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सर्वांचा मानसिक ताण-तणाव वाढत आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येकाचे मानसिक धैर्य वाढविण्यासाठी येथील योग विद्या धाम या संस्थेने रविवार दि.27 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 ते 7 या वेळेत ऑन लाईन ‘हार्मोन्सची हार्मोनी’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष सुंदर गोरे यांनी दिली.

     हे व्याख्यान योग विद्या धामचे व्याख्याते डॉ.अंकुश सुद्रीक देणार असून, व्याख्यान सर्वांसाठी मोफत आहे, असे सांगून डॉ.सुंदर गोरे यांनी पुढे सांगितले की, आपल्या परिचित लोकांना कोरोनाआजार तसेच कोरोना आजाराच्या परिस्थितीमुळे नोकरी, व्यवसाय, उद्योगधंदे व शेती व्यवसाय यातील समस्या आता व्यक्तीगत  पातळीवर भेडसावयाला लागल्या आहेत. अशा परिस्थितीत सर्व संकटावर धैर्याने मात्र करण्यासाठी हे व्याख्यान अत्यंत उपयुक्त आहे.

     व्याख्यानासाठी नाव नोंदणी करणे आवश्यक असून नाव नोंदणीसाठी http://forms.gle/3QWv3pitT8ghoJmha या लिंकचा वापर करावा. तरी उपयुक्त अशा व्याख्यानाचा जास्तीत जास्त  लोकांनी फायदा घ्यावा, असे आवाहन प्रकल्प प्रमुख संदिप मुळे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी योग विद्या धामचे कार्याध्यक्ष जयंत वेसीकर (मो.9850188107) यांच्याशी संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments